नांदेड(प्रतिनिधी)-शुल्लक कारणावरून शहरातील गाडीपुरा परिसरात काल दि.7 डिसेंबरच्या रात्री एका जमावाने कांही युवकांवर जिवघेणा हल्ला केला. हल्ला करतांना जमावाने विद्युत पुरवठा खंडीत केला होता. मोठी दगडफेक झाली. पण इतवारा पोलीसांनी अत्यंत जलदगतीने कार्यवाही करून 24 हल्लेखोरांपैकी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जखमी अवस्थेतील मंगेश रमेशराव पुरंदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 डिसेंबर रोजी गाडीपुरा भागातील छोटी दर्गा कॉर्नरवर त्यांचे किराणा दुकान आहे. रात्री 9 वाजेच्यासुमारास त्यांचे वडील दुकानावर बसलेले होते आणि ते घरात जेवन करत होते. त्यावेळी भोईगल्लीतील दोन युवक नितीन विजयसिंह ठाकूर आणि सोनु संजयसिंह ठाकूर हे दोघे किराणा साहित्य घेण्यासाठी आले. तेंव्हा तेथे थांबलेल्या कॉर्नरवरील जमावातील लोकांनी नितीन आणि सोनुकडे बोट दाखवून हेच दोघे होते असे सांगितले आणि जमाव पळत त्यांच्या दुकानावर आला आणि सोनु व नितीनला मारहाण करू लागला. मारहाण करणाऱ्यांमध्ये शेख इरफान, शेख पुरखान उर्फ गोरा, शेख सोहेल सत्तार, शेख अशफाख खान, सय्यद अलीमोद्दीन सय्यद रहिमोद्दीन, सय्यद माजीद सय्यद इमामोद्दीन, सय्यद असीफ सय्यद नकीम, सय्यद आदील सय्यद माजीद, सय्यद जाकीर सय्यद युसूफ, फेरोज खान सादीक खान, सलमान खान सादीक खान, सरफराज खान सादीक खान, मोहम्मद नासेर हुसेन मोहम्मद जाफर हुसेन, मोहम्मद आदेय हुसेन मुक्तार हुसेन, शाहीर अहेमद नासीर अहेमद, सय्यद इरफान सय्यद नफीस, मोहम्मद इमाम मोहम्मद जाकीर, मोहम्मद अफजल मोहम्मद अनवर, मोहम्मद इमाम हुसेन साब, फेरोज खान सादिक खान, एजाज, पाशा, जुबेर आणि शेख नदीमचा भाऊ असे 24 जण हल्लेखोर होते. त्यांनी आपल्या हातात तलवारी, रॉड, दगड, बेसबॉटस्टिक वापरून हल्ला केला होता. या लोकांनी मंगेश पुरंदरेच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. हल्लेखोरांनी हल्ला करतांना विद्युत पुरवठा खंडीत केला होता. मोठी दगडफेक झाली.
इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्तेपोड, पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, शेख असद आदींसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहचला आणि 24 हल्लेखोरांपैकी 13 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मंगेश पुरंदरेच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 297/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 326, 324, 427, 143, 147, 148, 149, 336, 337, 338 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, साथरोग अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि फौजदारी सुधारणा कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला आहे. या गुन्ह्यात काही जण उत्तरप्रदेशातील मुजफराबाद येथील आहेत.
