नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्चच्या घटनेतील अर्धापूर पोलीसांनी पकडलेल्या जिंदर सुखई या आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
29 मार्चच्या गुन्हा क्रमांक 114 मध्ये आरोपी म्हणून नाव असलेल्या हरजिंदरसिंघ उर्फ जिंदर जगिंदरसिंघ सुखई (28) यास अर्धापूर पोलीसांनी काल दि.7 डिसेंबरच्या रात्री अंबेगावशिवारात पकडले होते. आज दि.8 डिसेंबर रोजी वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस अंमलदार मधुकर टोनगे, बालाजी लामतुरे, गणेश श्रीरामे आणि राठोड यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जिंदर सुखईला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
जिंदर सुखईला दोन दिवस पोलीस कोठडी