29 मार्चच्या घटनेतील एफआयआरमध्ये नाव असलेल्या एकाला अर्धापूर पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 114 मधील एका फरार आरोपीला अर्धापूर पोलीसांनी जेरबंद करून वजिराबादच्या स्वाधीन केले आहे.
अर्धापूर येथील पोलीस निरिक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे, पोलीस अंमलदार फड, पांडे, गुन्नर, डांगे आदी आपल्या हद्दीत गस्त करत असतांना त्यांना माहिती मिळाली की, अंबेगाव शिवारात गुन्हा क्रमांक 114/2021 मधील आरोपी आहे. अर्धापूर पोलीस पथकाने तेथे जावून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव हरजिंदरसिंघ उर्फ जिंदर जगींदरसिंघ सुखई (28) असल्याचे सांगितले. अर्धापूर पोलीस पथकाने त्याला पकडून वजिराबाद पोलीसांच्या स्वाधीन केेले आहे.
हरजिंदरसिंघ सुखईचे नाव गुन्हा क्रमांक 114 च्या एफआयआरमध्ये आहे. 29 मार्च 2021 रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील जवळपास 25 लोकांना अटक झाली. कांही लोकांना उच्च न्यायालयाने तापुरता अटकपुर्व जामीन दिलेला आहे आणि कांही जणांची नावे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 फरार घोषित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यातील हरजिंदरसिंघ सुखई हा एक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *