जिल्हा परिषद व पंचायत राजची नवीन निर्वाचक गण रचना अधिनियमा नुसारच करा – धम्मा वाढवे

अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करू

जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

नांदेड ( प्रतिनिधी)-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील निवडणूक विषयक तरतुदी नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक विभागाणे 1962 च्या तरतुदीचे पालन करून सर्वत्र जिल्हा परिषदेच्या जागांची व आरक्षणाची चक्रानुक्रम नियम 1996 मधील निर्वाचक गणात रचना करण्याचे संविधानातील अनुच्छेद 243 के नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 9 अ नुसार हे बदल करण्याचे ठरवले आहे त्यानुसारच राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात नियम 10 नुसारच हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग /निर्वाचक गण रचना सध्या सुरू होणार आहे त्यामध्ये ही रचना करताना उत्तर दिशे कडून सुरवात करावी उत्तरेकडून ईशान्ये कडे त्यानंतर पूर्व दिशेकडून येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे रचना करताना सरकावे व शेवट दशिणेत करावी अन्यथा निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यात येईल व सबंधित रचणे मध्ये बद्दल केला तर न्यायालयात धाव घेतली जाईल असे सामाजिक कार्यकर्ते तथा नसोसवायएफ जिल्हा अध्यक्ष धम्मपाल वाढवे यांनी दि.7 डिसेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांच्या कडे दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे

हिमायतनगर तालुका एक ते दीड लाख लोकसंख्येचा तालुका आहे ह्या ठिकाणी सध्या 2 जिल्हा परिषद गण व 4 पंचायत समित्या आहेत पण आता महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशा नुसार ह्या ठिकाणी लोकसंख्ये नुसार गण रचना कार्यक्रम सुरू आहे त्यात काही राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावांला बळी पडून सबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीने बदल करणार आहेत असे शहरात बोलल्या जात आहे मागील काळात सुद्धा असे अनेक बद्दल झाले होते त्यामध्ये हिमायतनगर नगर पंचायत येथील दलीत वस्तीतील ई निविदेत मनमानी,घन कचरा ई निविदा सोडतीत सबंधित निविदेत सहभागी असलेल्या कंत्रादारांना विश्वासात न घेता नगर पंचायतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ती निविदां परस्पर सोडत केली असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्या कडे आहेत आता ह्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे ? त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या अधिनियम 1962 च्या तरतुदीचे पालन करूनच राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकातील नियम 10 नुसारच ही रचना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा नसोसवायएफ जिल्हा अध्यक्ष धम्मपाल वाढवे यांनी दि.7 डिसेंबर रोजी केली आहे ह्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यात येईल व सबंधित रचणे मध्येजर का बद्दल केला तर ह्या विरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *