नांदेड(प्रतिनिधी)-आपला वडीलोपार्जित वैद्यकीय व्यवसाय न निवडता फॅशन डिझाईनिंगच्या क्षेत्रात आपले पाऊल ठेवणाऱ्या कु.तन्वी खुरसाळे यांची निवड अमेरिकेतील स्टेट युनिर्व्हसीटी ऑफ न्युयोर्क मध्ये फॅशन इन्स्टीटुट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फॅशन डिझाईनिंगचे आधुनिक शिक्षण घेण्यासाठी निवड झाली आहे.
कु.तन्वी खुरसाळे ह्या डॉ.अजय खुरसाळे यांच्या सुपूत्री आहेत. तसेच डॉ.सुरेश खुरसाळे यांच्या नात आहेत. सुरूवातीपासूनच फॅशन डिझाईनिंग हेच आपल्या आवडीचे क्षेत्र आहे हे सुनिश्चित करून त्यांनी आपल्या जीवनाची सुरूवात केली. आपला वडीलोपार्जित वैद्यकीय व्यवसाय वगळून त्यांनी फॅशन डिझाईनिंगमध्ये आपले भविष्य पाहण्याचे ध्येय ठेवले.
स्टेट युनिर्व्हसीटी ऑफ न्युयोर्क, अमेरिका येथे फॅशन इन्स्टीटुट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये तन्वी खुरसाळे ह्या जगातील अत्याधुनिक फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेणार आहेत. त्यांच्या या निवडीचे नांदेड वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.शिवाजी वाडेकर, डॉ.शिरीष अर्धापूरकर, डॉ.ऋतुराज जाधव, डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल, डॉ.मनिष तुप्तेवार,प्रल्हाद गादेवार, डॉ.रविंद्र बिलोलीकर, डॉ.अर्चना बजाज, डॉ.गजानन देशमुख, डॉ.आनंद पाटील, डॉ.अभिषेक कोटलवार, डॉ.तुषार पाटील, डॉ.मनिष नळदकर यांच्यासह असंख्य डॉक्टरांनी आणि डॉ. खुरसाळे कुटूंबियांच्या जवळच्या व्यक्तीनी तन्वी खुरसाळे यांच्या निवडीचे कौतुक करत भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या आहेत.
तन्वी खुरसाळे यांची अमेरिकेतल्या फॅशन इन्स्टीटुट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड