नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडले, दुचाकी चोरली, मोबाईल चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसरणी परिसरात एक घर फोडून चोरटयांनी 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सोबतच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे आणि एक मोबाईल चोरीला गेला आहे. वजिराबाद भागातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. हदगाव तालुक्यातील वाळकी कॅम्प येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसरणी येथे महात्मा फुले चौक अन्सारी क्लिनीकचे मालक नोमान हुसेन अन्सारी खुर्रम हुसेन अन्सारी हे 7 डिसेंबर रोजी गावाला गेले. 8 डिसेंबर रोजी परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडलेला होता. त्यातून रोख रक्कम 20 हजार आणि सोन्या-चांदीचे दागिणे 45 हजार रुपये किंमतीचे असा 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला होता. नंादेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पद्दे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आदित्य टावर लातूरफाटा येथून सचिन साईनाथ पातावार यांची दहा हजार रुपये किंमतीची एक दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.पी.5352 ही 18 जुलै 2021 रोजी चोरीला गेली होती. त्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी 8 डिसेंबर 2021 रोजी नोंदवला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार तिडके अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून साई कमानजवळ भरणाऱ्या आठवडी बाजारात शिक्षक असलेले भगवान शंकर मोरे हे भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. 7 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता ते भाजी खरेदी करीत असतांन त्यांच्या खिशातील 28 हजार 400 रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
शहरातील नल्लागुट्टाचाळ दत्तमंदिराजवळ बापूराव नागोराव टिके यांनी आपली 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.वाय.7728 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता उभी केली. 2 डिसेंबर रोजी ही गाडी चोरीला गेली होती. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
हदगाव येथील एरीगेशन कॅम्प वाळकी येथे शेतकरी संभा इरबा शिनकरे यांनी आपली 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.1817 ही हिराबाई डोंगरे नाट्यमंडळाच्या पार्किंगमध्ये 5 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता उभी केली. एका तासातच ही गाडी चोरीला गेली आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार नामवाडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *