मनपाने नगर रचना विभागामार्फत यंदाच्या वर्षी नोव्हेंबर पर्यंत 16 कोटीची कमाई केली 

नांदेड(प्रतिनिधी)- आज महानगरपालिकेच्या नवनियुक्त स्थायी समिती सभापतीने यंदाच्यावर्षी नगर रचना विभागाच्यावतीने नोव्हेंबरपर्यंत 16 कोटी रुपयांची वसुली केली आहे. नांदेड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांनीही माहिती दिली.आज नवनियुक्ती स्थायी समिती सभापती किशेार स्वामी यांनी नगर रचना विभागासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर मनपाने पाठवलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान नोव्हेंबर महिन्यापर्यंतच 16 कोटी रुपयांची वसुल करण्यात आली आहे. यावर्षीच्या 983 संचिकांपैकी 823 संचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. सन 2019-20 मध्ये 14.60 कोटी रुपये नगर रचना विभागाने मिळवले होते. साल सन 2020-21 दरम्यान 12.50 कोटी रुपये महानगरपालिकेला मिळाले होते. स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांनी नगर रचना विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यांना कारण मिमांसा नोटीस देण्यास सांगितले. तसेच मागील 12 वर्षापासून नगर रचना विभागात ठाण मांडलेल्या एका कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्यास सांगितले. नगर रचना विभाग हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. म्हणून या विभागाच्या कामाची गती वाढविण्याची सुचना किशोर स्वामी यांनी केली. कामात सुधारणा करा, वास्तुइशारद  संचिका दाखल करताच तेंव्हा परिपुर्ण संचिकाच घ्या, त्रुटी असलेली संचिका स्विकारू नका कारण त्यामुळे कामाची गती मंदावते. या बैठकीत सहाय्यक संचालक नगररचना मनोज गर्जे, नगररचनाकार पवार यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *