मनपा प्रभाग क्रमांक 13 पोट निवडणुक ; तिरंगी लढत 

नांदेड(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 अ मधील पोट निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार आहे. इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 अ चौफाळा, मदिनानगर पोट निवडणुक 2021 दरम्यान आज 9 डिसेंबर 2021 अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार जणांनी  आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता या पोट निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रसच्यावतीने मुस्कान नाज सय्यद वाजिद, भारतीय जनता पार्टीच्यावतीने लक्ष्मीबाई बाबूराव जोंधळे, एमआयएमच्यावतीने रेशमा बेगम सलीम बेग असे तीनच उमेदवार शिल्लक राहिले आहेत. आता प्रभाग क्रमांक 13 अ ची पोटनिवडणुक तिरंगी लढत होणार आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. पोट निवडणुकीदरम्यान 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *