नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत खंडणीखोर दत्तात्रय पांडूरंग अनंतवारविरुध्द तिसरा गुन्हा आज वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ज्या लोकांना अशा लोकांकडून त्रास झाला असेल त्यांनी पोलीसांकडे यावे असे आवाहन पोलीसांनी केले होते.
भगवान गोविंदराव कंधारे रा.सायाळ पोस्ट मरळक नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कवाना ता.हदगाव येथील दत्तात्रय पांडूरंग अनंतवार याने त्यांना तुमची स्वयंदिप मागासवर्गीय स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्था ही बेकायदेशीर आहे. तुमची संस्था बंद करणे, तुला संस्था चालू ठेवायची असल्यास पाच लाख रुपये द्यावी लागतील असे म्हणून पैसे नाही दिले तर तुला कामाला लावतो, जीवे मारतो अशी धमकी दिली. सोबतच भगवान कंधारेवर दबाव टाकून त्यांच्याकडून 3 लाख रुपये खंडणी स्विकारली आहे. या तक्रारीनुसार हा घटनाक्रमांक मे 2021 ते सप्टेंबर 2021 दरम्यान वजिराबाद चौकात घडला आहे. वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 444/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 386, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याच लोकांच्या संदर्भाचे पहिले सुध्दा कांही गुन्हे रवि वाहुळे तपास करीत आहेत.
सर्वसामान्य माणुस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी यांना वेगवेगळ्या कारणांसाठी वेठीला धरुन खंडणी मागणाऱ्यांचे हे मोठे रॅकेट आता पोलीसांनी समोर आणले आहे. जनतेने सुध्दा असे कांही खंडणीचे प्रकार त्यांच्यासोबत घडले असतील तर पोलीसांनकडे यावे असे आवाहन पोलीसांनी केलेले आहे. या खंडणीमध्ये अजुन कोणी असतील तर त्याबाबत सुध्दा जनतेने पोलीसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीसांनी केली आहे.
खंडणीखोर अनंतवारविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल