दोन घर फोडले, तीन दुचाकी चोरी, शेतातील साहित्याची चोरी ;2 लाख 52 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील दिग्रस (बु) येथे एक घरफोडले आहे. मुदखेड गावात एक घरफोडी झाली आहे. नांदेड शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, भाग्यनगर आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. मनाठा जवळी नेवरी शिवारात शेती वापराचे साहित्य चोरीला गेले आहेत. या सर्व सहा चोरी प्रकारांमध्ये 2 लाख 52 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
विकास खंडोजी मुदळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबरच्या दुपारी 1 ते सायंकाळी 5 अशा 4 तासांच्यावेळेत मौजे दिग्रस (बु) येथील त्यांच्या घराच्या दरवाज्याला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 69 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. कंधार पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार टाकरस अधिक तपास करीत आहेत.
धनगरगल्ली मुदखेड येथील शिवाजी चांदु तुप्पे यांचे घर चोरट्यांनी 8 डिसेंबरच्या सायंकाळी 7 ते 9 डिसेंबरच्या पहाटे 8 वाजेदरम्यान फोडले आहे. घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 60 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
वाघाळा जवळील मारोती मंदिराशेजारी प्रकाश देवराव बोगरे यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.ई.7501 दि.27 नोव्हेंबर रोजी रात्री उभी केली होती. 28 नोव्हेंबरला पहाटे ही गाडी चोरी गेल्याचे दिसले. या गाडीची किंमत 10 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा 9 डिसेंबर रोजी दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार शिंदे करीत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर येथून 8 डिसेंबर रोजी दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.9289 ही 60 हजार रुपये किंमतीची गाडी 8 डिसेंबर रोजी चोरीला गेली. या बाबत अमोल नंदकुमार बोबडे यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिरसाठ अधिक तपास करीत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून शिशीकांत राजू बहादुरे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.8003 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 9 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 अशा अर्ध्या तासाच्या वेळेत चेारीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार डोईवाड अधिक तपास करीत आहेत.
मनाठा जवळील नेवरी शिवारातून कंठेश्वर गणेशराव शिंदे यांच्या शेतातील मळणी यंत्रावरील साहित्य 13 हजार रुपये किंमतीची चोरट्यांनी चोरले आहे. मनाठा पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार एम.ए.पवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *