नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील नवीन मोंढा भागातून मयूर एजन्सी या दुकानातून चोरट्यांनी मालकाची नजर चुकवून दोन लाख रुपयांची बॅग घेवून पळ काढला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी चेतन बाहेती यांच्या मालकीच्या मयूर एजन्सी या दुकानात दोन जण आले. त्यावेळी मयूर एजन्सीमधील पैसे ठेवण्याची अलमारी उघडी होती. बोलण्याच्या नादात मालकाला लावून चोरट्यांनी त्या उघड्या अलमारीतील 2 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लंपास करून पळून गेले. प्रत्यक्ष दर्शीने सांगितले की, ते चोरटे दोन नव्हते तर ते चार जण होते. दोन दुचाकींवर चार जण आले होते. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे हे त्वरीत प्रभावाने घटनास्थळी पोहचले. त्या ठिकाणी दिसणाऱ्या परिस्थितीनुसार सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.