नांदेड(प्रतिनिधी)-मोटारवाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून अद्यावत करण्यात येणार आहे. आता पुढे ई चालन मशीन अद्यावत झाल्यावर लगेच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे परिपत्रक वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी झाले आहे. वाहनधारक, चालक आणि मालक या सर्वांनी आता दक्षता घेण्याची तसेच कायद्याच्या नियमांची काटकोर पालन होईल अशा पध्दतीने वाहन वापरावे नसता दंडाची रक्कम भरपूर मोठी करण्यात आलेली आहे. कांही चुकांसाठी दुसऱ्यावेळेसचा दंड दुप्पट किंवा तिप्पट असेल.
मोटारवाहन कायद्यात आता सुधारणा आलेली आहे. 194 प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांसाठी यामध्ये दंडाची वाढ करण्यात आली आहे. कांही नियमांमध्ये तरतुद अजून झालेली नाही. तरतुद झालेल्या नियमांमध्ये यापुढे होणारे दंड आणि तशीच चुक दुसऱ्यांदा केल्यानंतर होणारे दंड कंसात लिहिले आहेत.
वैध परवाना शिवाय 16 वर्षाखालील व्यक्तींनी वाहन चालवणे -5000 (तरतुद नाही), एखाद्या वाहनचालकाचा परवाना अपात्र असेल आणि त्याने वाहन चालवले तर -10000 (तरतुद नाही), बिना वैध नोंदणी असलेली दुचाकी मालक -2000(5000)वैध परवान्याशिवाय वाहन चालवणे-5000 (तरतुद नाही), बिना वैध विमा प्रमाणपत्र मालक-2000(4000), एल हे अक्षर न लिहिता गाडी चालवणे-500(1500), बेकायदा फलक उदाहरणार्थ बाबा, मामा, भाऊ, दादा-1000 (तरतुद नाही), विना हेल्मेट-500 आणि परवाना रद्द तीन महिन्यासाठी (तरतुद नाही), मोबाईल गाडी चालवतांना वापरणे-500(1500), सीट बेल्ट न वापरणे-500(1500), एक दिशा मार्गावर प्रवेश बंदी-500(1500), मोटारसायकलवर ट्रीपलसिट-1000 आणि तीन महिने परवाना रद्द (तरतुद नाही),चालकास अडथळा होईल अशा जागी बसणे-500(1500), वाहनाच्या बाहेरील फळीवर स्वार होणे-500(1500), अज्ञादर्शक वाहतूक चिन्हांचे अनुपालन न करणे-500(1500), अयोग्य चालक शारिरीक व मानसिकरित्या-1000(2000),प्रखर प्रकाश, विना प्रकाश सुर्यास्तानंतर, विना पार्कींग प्रकाश , प्रकाश दिसत नाही प्रत्येकास-500(1500), शांतता क्षेत्रात वारंवार हॉर्न वाजविणे, हॉर्न वाजविण्यास बंदी असलेले क्षेत्र-1000(2000), वाहनास अजब प्रकारचे हॉर्न बसविणे, पोलीसांनी केलेल्या इशाराचे पालन न करणे, पोलीसांनी थांबण्यास सांगितले असता उल्लंघन करणे-500(1500), शर्यत आणि वेग परिक्षण-5000(10000), तीन चाकी गाडी वेग उल्लंघन-1000, वेगमर्यादा उल्लंघन ट्रॅक्टर-1500 , चार चाकी वाहन वेगमर्यादा उल्लंघन-2000, इतर वाहन वेगमर्यादा उल्लंघन-4000 (तरतुद नाही), असुरक्षीत व धोकादायक मालक वाहतुक-500(1500), तीन चाकी वाहनात असुरक्षीत मालवाहतुक-1000 आणि तीन महिन्यासाठी परवाना रद्द (3000), इतर वाहनांमध्ये असुरक्षीत माल वाहतुक-2000 आणि परवाना रद्द (5000), दुसऱ्याच्या वाहनाला असुरक्षीतपणे ओढणे(टोईंग), रंगीत काचा, बिना मडगार्ड, बाजूचा आरसा नसणे दुरचित्रवाणी व्हिडीओ चालविणे, बिना सायलन्सर, चाके बळकट नसणे, वायपरविना-500(1500), लाल परिवर्तकाबिना-1000(तरतुद नाही), रिक्षा टॅक्सी भाड्यावर देण्यास नकार-50, टॅक्सी व बस भाड्यावर देण्यास नकार-200, मोटार कॅब थांब्याबाहेर उभा पुरेसा इंधन साठा नाही-500(1500), अतिरिक्त प्रवाशी वाहतुक-200, दोन अतिरिक्त प्रवाशी -400, 3 अतिरिक्त प्रवाशी-600, 4 अतिरिक्त प्रवाशी-800, पाच अतिरिक्त प्रवाशी-1000, मिटर झेंडा खाली ठेवून गाडी थांब्यावर उभी-500-1500, परवाना धारक वाहनात स्वच्छकास नेणे, चालक गणवेश पांढरा नसणे, प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ओरडणे, चालक गाडी चालवतांना धुम्रपान करणे, पर्यटन वाहनात विना विहित गणवेश, इतर सामानामुळे माल वाहक गाड्यांमध्ये सह चालकास अडथळा करणे-500(1500) विना वैध प्रमाणपत्र चालक 2000(4000), ज्याकडे परवाना नाही अशा माणसास गाडी चालविण्यास देणारा मालक-5000, विना वैध नोंदणी चालक-2000(5000), पोलीस निर्देशांचे अनुपालन न करणे-750, रस्ते सुरक्षा मानके भंग करणे-100 आणि परवाना रद्द (3000), विना योग्यता वैध प्रमाणपत्र दुचाकी चालक, मालक-2000(5000), गादीवर निर्धारीत उंचीपेक्षा जास्त सामान ठेवणे दुचाकी आणि तीन चाकी-1000 आणि परवाना रद्द(3000), दोन आणि तीन चाकी व्यक्तीरिक्त वाहनांमध्ये असे करणे-2000 परवाना रद्द (5000), वैध परवान्याशिवाय चालक, मालक किंवा वाहनाचा ताब्येदार-10000, गीअरबॉक्स मोकळा ठेवून वाहन चालविणे, घाटात वाहन न्युट्रल करून चालविणे दोन आणि तीन चालकी वाहन-1000 तीन महिने परवाना रद्द (3000) , दोन आणि तीन चालकी वाहनाव्यक्तीरिक्त असे करणे-2000 परवाना रद्द (5000), एका चालकाच्या नावे दोन अनुज्ञापत्र असणे-750, आगीचा बंब आणि रुग्ण वाहिकांना जागा न देणे-1000, वाहन चालविण्यासाठी लागणाऱ्या अनुज्ञापत्रासाठी अपात्र असलेल्या व्यक्तीने वाहन चालविणे-1000.
अशा प्रकारे 500-1500 या कक्षेत असणारे विविध कारणे पुढील प्रमाणे आहेत. डबल पार्किंग, पोलीसाच्या परवानगीशिवाय सायकल ट्रॅक आणि फुथपाथवर गाडी, वैध परवाना सादर न करणे, लेखी मागणीनंतर 15 दिवसांत दस्ताऐवज सादर न करणे, विना आरटीओच्या परवानगी ट्रान्सपोर्ट वाहनांवर जाहिरात करणे, खाजगी वाहनांवर प्रेस, पोलीस , ऍडव्होकेट, पोलार्ईट असे शब्द चित्र चिटकवणे, वाहन चालू असतांना अनावश्यक आवाज किंवा भय सुचक आवाज, सिंगनल तोडणे, वैध बिल्ला नावावर नसणे, अवजड प्रवाशी वाहन चालक, अवजड वाहन स्वच्छकाशिवाय, नोंदणी क्रमांक विहित मोजमापात नसणे, निशाणी क्रमांक फलकावर चित्र प्रदर्शीत करणे, वाहनाच्या पुढील व मागील क्रमांक फलक दर्शमानता असा नसणे, परिवहन वाहनाचा क्रमांक चारही दिशेला प्रदर्शीत नसणे, नोंदणी क्रमांक टॅक्सीच्या डॅश बोर्डवर रंगवलेला नसणे, ट्रेलरच्या पाठीमागे क्रमांक फलक प्रदर्शीत नसणे, वैयक्तीक नाव क्रमांक फलकावर लिहिणे, हलक्या मोटारवाहनांचा क्रमांक फलक मध्यावर नसणे, परिवहन वाहनाचा पाठीमागील क्रमांक फलक विना प्रकाशमय असणे, क्रमांक फलकावरील अक्षरे इंग्रजी आणि अरेबीक नसतील तर, तुटलेला क्रमांक फलक, वैध बिल्ला परीधान न करता सार्वजनिक सेवा वाहन चालविणे, अनाधिकृत रंगाचा फलक, नोंदणी क्रमांक चार आकडी नाही, मोटारसायकलचा क्रमांक फलक हॅंडबारला समांतर नाही, बिना इंडिकेटर, भार किंवा इतर कारणामुळे क्रमांक फलक न दिसणे, क्रमांक नसलेले वाहन चालविणे आणि उभे करणे, वैध पियुसी नसणे, वैध अनुज्ञापत्र सादर न करणे, परवानाधारी प्रत्येक वाहनावर सेवा चालकाचे नाव रंगविणे,वाहन चालवितांना चालक डीजिटल व्हिडीओ, स्टॉप लाईन अगोदर वाहन न थांबविणे, माल वाहतुक चालकाच्या कॅबीनमध्ये अतिरिक्त माणुस बसविणे, सार्वजनिक आणि सेवा वाहन अस्वच्छ असणे, 12 वर्षापर्यंतच्या बालकास अटकाव व्यवस्थेशिवाय बैठक दिली नाही तर, मोठ्या आवाजत संगीत लावणे, वाहन पाठी मागे घेण्याबद्दल निर्बंध करणे, सार्वजनिक ठिकाणी वाहन पाठी मागे उलट दिशेने चालविणे, वाहन उभे करण्याचे दिवे सुरू असतांना वाहन चालविणे, माल वाहु वाहनातून माणसाची वाहतुक, सैन्य आणि पोलीस रंग आणि नोंदणी चिन्हांचा वापर करणे, प्रवाशी व इतरांसोबत गैरवर्तणूक करणे, धोकादायक पदार्थ वाहुन नेणे, वाहकासाठी आरक्षीत जागेत प्राणी किंवा वस्तु ठेवण्यास परवानगी देणे, खाकी गणवेशाविना चालक प्रवाशात अनावश्यक विलंब करणे, बिल्ला प्रदर्शीत न करणे, सार्वजनिक ठिकाणी लोकांना धोका होईल, अडथळा होईल अशी गाडी उभी करणे, स्पीडो मिटर अयोग्य राहणे, बाहेर राज्यातील वाहनांनी स्थानिक आरटीओकडून एफटी परवानगी न घेणे अशा प्रकारे 194 प्रकारांमध्ये मोटार वाहन कायद्यात झालेली सुधारणा मोटार वाहन चालक, मालक आणि वाहनाचे ताबेदार यांनी अत्यंत बारकाईने लक्षपुर्वक पाहण्याची गरज आहे. जेणे करून आपल्याकडून चुक होणार नाही आणि आपल्याला मोठा दंड लागणार नाही. –
वाहन चालकांनो दंडाची रक्कम भरपूर वाढली ; आता तरी कायदा पाळा