नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील मार्कंडे मंदिराजवळ एका 35 वर्षीय माणसाला 5 जणांनी पोटात आणि पाठी मागे ढोपरांवर चाकुने भोकसून त्याचा खून केला आहे. वृत्तलिहिपर्यंत वजिराबाद पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार मिलिंद बाबूराव गायकवाड हे गंगाचाळ भागात राहतात. त्यांचा व्यवसाय मालवाहु गाडी चालवणे असा आहे. काल दि.12 डिसेंबर रोजी गंगाचाळ परिसरात त्यांचा भाऊ राहुल बाबूराव गायकवाड (35) यास पाच जणांनी मार्कंडे मंदिरजवळ बोलावले आणि तेथे त्या पाच पैकी एक जण असा होता ज्याच्याविरुध्द राहुल गायकवाडने न्यायालयाने साक्ष दिली होती. तु माझ्याविरुध्द कशी साक्ष दिलीस असा प्रश्न विचारून त्याला पाच जणांनी वेगवेगळ्या पध्दतीने मारत हल्ला केला. राहुल गायकवाडने सात -आठ वर्षापुर्वी दिलेल्या साक्षीचा बदला घेतांना मारेकऱ्यांनी राहुल गायकवाडच्या पोटात आणि पाठीमागे ढोपरांवर चाकु भोकसले.
कांही प्रत्यक्षदर्शी सांगतात मिलिंद गायकवाड 12 डिसेंबर रोजी घरी आले तेंव्हा त्यांची आणि राहुलची भेट पक्कीचाळ पोलीस चौकीसमोर झाली. त्यावेळी मिलिंद गायकवाडने आपला भाऊ राहुल गायकवाडला लवकरात लवकर घरी येण्यास सांगून मिलिंद गायकवाड घरी निघून गेले. मारहाण करणाऱ्यांमध्ये अविनाश बाटल्या नावाचा युवक आहे. त्याने 13 मार्च 2021 रोजी स्वत:च स्वत:ला मारुन घेवून मिलिंद आणि राहुल गायकवाडविरुध्द जीवघेणा हल्ला केल्याची केस केली होती. त्यात दोन्ही गायकवाड बंधूंना न्यायालयाने जामीन दिला होता. राहुल गायकवाडला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले तेंव्हा डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले.
राहुल बापूराव गायकवाडला चाकु भोसकून मारणाऱ्या लोकांमध्ये निलेश थोरात, सुधाकर साहेबराव इंगोले, अविनाश उर्फ बाटल्या साहेब इंगोले, रितेश उर्फ साहेबराव इंगोले, पांडूरंग साहेबराव इंगोले अशा पाच जणांचा समावेश आहे. याबद्दल वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना विचारणा केली असता त्यांनी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नसल्याचे सांगितले.
गंगाचाळमध्ये पाच जणांनी 35 वर्षीय व्यक्तीचा चाकु भोकसून खून केला