नांदेड(प्रतिनिधी)- गुरूद्वारा सचखंड श्री हजुर साहिब येथे भाविकांनी दिलेल्या मौल्यवान वस्तुंमध्ये खुपमोठा अपहार झाला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समितीची नेमणुक करावी अशी मागणी करणारे पत्र सिख समाजातील कांही लोकांनी महाराष्ट्राच्या महसुल मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे.
नांदेड येथील स.महेंद्रसिंघ लांगरी, स.मनप्रितसिंघ, स.रणजितसिंघ गिल, स.गुरमितसिंघ बेदी, स.गुरपालसिंघ खालसा, स.हरपालसिंघ सोढी, स.वजिरसिंघ फौजी, स.सरबजितसिंघ हॉटेलवाले, स.गुरदिपसिंघ संधू, स.सुखपालसिंघ आदींनी स्वाक्षरी केलेले एक निवेदन प्रसिध्दीसाठी पाठवले आहे.
दि.15 डिसेंबर रोजी हे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या महसुल मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनात गुरूद्वारा बोर्ड हे नांदेड येथील गुरूद्वारा सचखंड श्री हजुर साहिबचे कामकाज सुरळीत चालविण्याकरीता गुरूद्वारा कायदा 1956 निर्माण केलेला आहे. गुरूद्वारा येथे येणारे भाविक असंख्य वस्तु भेट देतात. त्यामध्ये सोने, चांदीे, हिरे आणि त्यापासून तयार केलेल्या मौल्यवान वस्तु समाविष्ट असतात. ऑडीट रिपोर्टचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी असे दिसते की, गुरूद्वारा बोर्डास प्राप्त झालेल्या सोने, चांदी, हिरे आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तुंमध्ये मोठा अपहार झालेला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी लोकांविरुध्द कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात आहे.
गुरूद्वारा बोर्डाकडे असलेल्या मौल्यवान वस्तुंमध्ये अपहार झाला; चौकशीसाठी निवेदन