नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरच्या जनतेचे विधानसभा निवडणुकीत आणि मागील नगर पंचायत निवडणुकीत कॉंगे्रसला जनतेने दिलेले यश याबद्दल धन्यवाद व्यक्त करत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यापुढे सुध्दा मी अर्धापूरच्या विकासाला कट्टीबध्द असल्याचे सांगितले. अर्धापूरच्या निवडणुकीत लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे माजी नगरपंचायत अध्यक्ष आणि कॉंगे्रसचे उमेदवार मोहम्मद लायख मोहम्मद सिद्दीकी यांच्याविरुध्द राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाने बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचा संस्थापक अध्यक्ष आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आरोपी शेख जाकीर शेख सगीरला उमेदवारी देवून आपला पराभव निश्चित केला आहे.
काल दि.15 डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये कॉंगे्रस पक्षाला मतदान करा असे आवाहन करत एका जाहीर सभेला संबोधीत केले होते. त्यामध्ये त्यांनी आपल्याच आशिर्वादाने मला विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान मिळाले. आज मी राज्यात आपलाच मंत्री म्हणून काम करतो आहे. सध्या माजी सरकार आहे, पैसे मीच देणार आहे आणि काम सुध्दा मीच करणार आहे असे सांगून यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मतान करा असे आवाहन जनतेला केले.
अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये कॉंगे्रस पक्षाचे उमेदवार मोहम्मद लायख मोहम्मद सिद्दीकी हे कॉंगे्रसचे उमेदवार आहेत. या प्रभागात एकूण 7 उमेदवार आहेत. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाने बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या नावावर अनेक ठिकाणी लोकांना वेठीला धरुन स्वत:च मी महाराष्ट्र भूषण असल्याचे सांगणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरला दिलेली उमेदवारी त्याला हरविण्यासाठीच आहे काय असे प्रभाग क्रमांक 3 मधील नागरीक सांगतात. शेख जाकीर शेख सगीरविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल असतांना राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाने शेख जाकीरला उमेदवारी देवून खऱ्या अर्थाने एका नवीन राजकीय समिकरणाला हातभार लावला आहे. राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाच्या नेत्यांना प्रचार करतांना हे सांगावे लागेल की हा विनयभंगाचा गुन्हेगार असला तरी मतदान त्याला करा. शरदचंद्र पवार यांच्या निष्कलंक राजकारणात राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचा उदय झाला. आजही त्यांनी शरदचंद्र पवार हे काय आहेत संपुर्ण देशाला दाखवून दिले आणि त्यांच्या पक्षात विनयंभगाच्या आरोपीला उमेदवारी देवून नांदेड जिल्हा राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाने दिलेला हा आदर्श शरदचंद्र पवार यांच्या समक्ष जाईल तेंव्हा ते काय प्रतिक्रिया देतील हे पाहण्यासारखे आहे.
अर्धापूर येथील अनेक नागरीक सांगतात प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक लोकांना दबावामध्ये ठेवून शेख जाकीर शेख सगीर स्वत:ला मतदान मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. पोलीस ठाणे अर्धापूर येथून सुध्दा त्याला सहकार्य असते असे कांही जण सांगतात. ते सहकार्य का असते याबद्दल नांदेड जिल्ह्यात कार्यरत सुर्याजी पिसाळसारख्या अधिकाऱ्यांना विचारायला हवे. ही विचारणा पालकमंत्र्यांशिवाय कोण करू शकणार? अर्धापूर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेने शेख जाकीर शेख सगीरबद्दलचा ईतिहास माहिती असतांना त्याला ते निवडूण देतील याची तिळमात्र पण जागा आज दिसत नाही.
…राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अर्धापूर निवडणुकीत विनयभंगाच्या आरोपीलाच उमेदवारी दिली