ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)- ट्रक्टरच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा जीव गेल्याचा प्रकार येळेगाव ता.अर्धापूर येथे 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडला.
रंगनाथ बळीराम जाधव (55) वर्ष रा.असर्जन ता.जि.नांदेड हे दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.व्ही.4161 वर बसून जात असतांना येळेगाव ता.अर्धापूर येथे मदन कपाटे यांच्या पाणी प्लॅन्ट दुकानासमोर ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.26 बी.सी.6518 च्या चालकाने त्यांच्या दुचाकी गाडीला समोरून जबर धडक दिली. त्यात रंगनाथ बळीराम जाधवचा मृत्यू झाला. याबाबत लक्ष्मण बळीराम जाधव यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *