
सर्वप्रथम 2019 मध्ये , वयाच्या पासष्टी मध्ये एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला घश्याच्या कॅन्सरचे मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल येथे निदान झाले .वेळ न घालवता , रेडिएशन आणि केमोथेरपी चा उपचार करून , आजार पूर्णपणे गेला . परंतु , 2020 मध्ये कॅन्सर पुन्हा वापस आला. आयुष्याचा अंत इथेच गाठला असे सगळ्यांना वाटेल . परंतु तेंव्हा त्यांवर केमोथेरपी ने उपचार करण्यात आले . आणि यशस्वी रित्या त्यांनी उपचार पार पाडून दुसऱ्यांदा कॅन्सेवर मात केली . घरातील आणि गावातील सर्वच मंडळी एकदम आनंदी झाले . मधेच लॉकडाऊन च्या कारणास्तव फोलो उप होऊ शकला नाही .2021 जून मध्ये जेंव्हा ते फोलो उप ल आले , तेंव्हा त्यांनी जेवताना नकळत दुखत असल्याचे सांगितले आणि डॉक्टर सुप्रिया ह्यांनी त्यांच्या आवाजा मध्ये झालेला फरक पण बारकाईने नोंद केला आणि कॅन्सर वापस असल्याचा संशय बळकट झाला . पुढे लगेच तपासाला लागून , निश्चितता पूर्ण केली . इंडोस्कॉपी आणि पेट स्कॅन मध्ये कॅन्सर असल्याचे दिसून आले . दोनदा लढाई जिंकली होती , तिसऱ्यांदा मरणाला हुलकावणी देता येणार नाही हे ठाम झालं होत.
ह्यावेळेस मरण निश्चित आहे हे मनाशी ठाम धरलं होत . पण जेवढे प्रयत्न होतील तेवढे करायचे हे पण ठरवलं होत . लक्षणांकडे लवकरच लक्ष घातल्यामुळे लवकर निदान होऊन , कॅन्सर छोटा असताना पकडण्यात आला. आणि लगेच डॉक्टर सुप्रिया ह्यांनी त्यांचे उपचार सुरू केले .डॉक्टरांच्या नियमाने भेटणाऱ्या सल्ल्याने धीर वाढत जात होता . जशी जशी ट्रीटमेंट पुढे जात होती , लक्षणांमध्ये सुधार जाणवत होता. आपण बरे होऊ कदाचित असे वाटत होते. हळूहळू आत्मविश्र्वास वाढत गेला . जेवण पण जोमाने सुरू ठेवले . तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर , असेसमेंट स्कॅन झाला आणि त्यात चमत्कार दिसून आला . कॅन्सर पूर्णपणे बरा झालेला . डॉ. सुप्रिया सोनजे यांचे शर्थिचे प्रयत्न आणि त्यांच्याकडुन मिळालेला आत्मविश्वास बघुन दोनदा जिंकलो तसा पुन्हा कॅन्सर अजून एकदा हरवणारच या आत्मविश्वासाने औषधोपचारांच्या जोरावर पुन्हा तिसऱ्यांदा कॅन्सरला हरविले आहे. त्यांच्या या आत्मविश्वासाला अनेकजन सलाम करत आहेत.आजार कितीही गंभीर असला तरी, तो योग्य वेळी योग्य उपचारातून बर होऊ शकतो. हे या आजोबांच्या वयाच्या आंदाजावरुन सिद्ध झाले आहे. त्यासाठी डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या-औषधे वेळेवर घेणे, डॉक्टरचा सल्ला घेणे, यात रुग्ण व घरच्यांनी कुठेही कमतरता ठेवू नये.
-डॉ. सुप्रिया सोनजे
कॅन्सर आजार तज्ज्ञ , मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल नांदेड