गोदावरी नदीच्या मोबाईल छायाचित्रांची ऑनलाईन स्पर्धा; प्रवेश सर्वांसाठी खुला

नांदेड (प्रतिनिधी )  – रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमांतर्गत गोदावरी नदीच्या उत्सवा निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोबाईल छायाचित्रांची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्वांना खुला प्रवेश ठेवण्यात आला आहे.

गोदावरी नदीचा विषय जरी असला तरी यात प्रामुख्याने त्रिकूट येथील गोदावरी व आसना नदीचा संगम परिसर निर्धारित करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी छायाचित्र हे रंगीत अथवा कृष्णधवल सादर करता येईल. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना यात सहभाग घेता येईल. छायाचित्रांचा विषय त्रिकूट येथील गोदावरी संगम असून येथील नदीचे आपल्याला आवडेल ते ठिकाण (नदीपात्र, प्रवाह, नदी परिसर) असावे. प्रत्येक स्पर्धकाला एकच छायाचित्र स्पर्धेसाठी सादर करता येईल. स्पर्धकांनी आपली छायाचित्र दि. 19 डिसेंबर पर्यत potdarcn@gmail.com किंवा dionanded16@gmail.com  संकेतस्थळ अर्थात ई-मेल व व्हॉटस अपवर क्र. 9422171776 किंवा 8329417188 वर सादर करावीत. व्हॉटस अपवर छायाचित्र सादर करताना ते चांगल्या पिक्सेलचे पाठविण्याबाबत नियोजन करावे. विजेत्या पहिल्या पाच स्पर्धकांना जिल्हा प्रशासनातर्फे ग्रंथ व प्रमाणपत्र दिले जातील. परिक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील, असे संयोजकातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *