नांदेड (प्रतिनिधी)- येथील गांधी राष्ट्रीय विदयालय गवळीपुराच्या मुख्याधिपिका सौ. वैशालीताई गोपालसिंह चौहान यांचे ह्दयविकाराच्या तिव्र धक्क्याने १८ डिसेंबर २०२१, शनिवार रोजी सोलापूर येथे दुःखद निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता, (रविवार, १९ डिसेंबर) रोजी राहते घर बोरबन परिसर, नांदेड येथून निघणार असून गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ..
सौ.वैशालीताई चौहान या सिटी चिटस् व सिटी निधी चे संचालक गोपालसिंह चौहान यांच्या सुविद्य पत्नी होत्या तर विशालसिंह तेहरा यांच्या भगिनी होत्या त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे..