महाराष्ट्र प्रदेश खाण्डल संघटनेच्या उपाध्यक्षपदी द्वारकादास शर्मा आणि संघटन सचिव पदावर ऍड. दिपक शर्मा यांची नियुक्ती

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश खाण्डल विप्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी नांदेड येथील द्वारकादास शर्मा (माटोलीया)आणि संघटन सचिवपदी ऍड. दिपक शर्मा(बढाढरा) या दोघांची नियुक्ती करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष जयरानारायण खंडेलवाल (रुथळा) यांनी दिले आहे.
दि.31 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी लातूर येथील जयनारायण खंंडेलवाल यांची नियुक्ती झाली. आपल्या संघटनेचे कामकाज उत्कृष्टरितीने चालावे यासाठी 5 डिसेेंबर 2021 रोजी त्यांनी राज्यभर अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यांचे जाहिरीकरण काल दि.19 डिसेंबर रोजी अकोला येथे झालेल्या पदग्रहण समारंभात करण्यात आले. या कार्यक्रमात खांडल विप्र महासभेचे अध्यक्ष रामेश्र्वरजी सोती, अकोलाचे आमदार गोवर्धन शर्मा, माजी महासभा अध्यक्ष मुरारीलालजी गोरसीया यांच्या समक्ष नवीन महाराष्ट्र प्रदेश संघटनेचा शपथविधी झाला.
यामध्ये नांदेड येथील द्वारकादास गुलाबचंद शर्मा यांची उपाध्यक्षपदावर आणि ऍड.दिपक ओमप्रकाशजी शर्मा यांची संघटन सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटनेचा कार्यकाळ डिसेंबर 2024 पर्यंत आहे. नियुक्ती पत्र देतांना जयनारायण खंडेलवाल यांनी उपाध्यक्ष द्वारकादास शर्मा आणि संघटन सचिव ऍड. दिपक शर्मा यांच्याकडून खाण्डल समाजाच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने आपण काम करावे आणि समाजाची उन्नती करण्यासाठी मेहनत घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. द्वारकादास शर्मा आणि ऍड. दिपक शर्मा यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *