नांदेड(प्रतिनिधी)- येथिल गुरुद्वारा लंगर साहिब द्वारा चालवल्या जाणाऱ्या नागिना घाट च्या संत बाबा निधानसिंघ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लंगर साहिब गुरुद्वाराचे मौजुदा मुखी नांदेड भूषण संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते या डिजिटल एक्स-रे मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ हरजींदर सिंघ,बाबा अमरजीतसिंघ टाटावाले, डॉ हंसराज वैद्य,डॉ दागडीया,डॉ बोटलावार, बाबा दलेरसिंघ,बाबा गुरकरपाल सिंघ, डॉ. चौधरी, डॉ. राजेंद्र पाटील,डॉ. चौधरी, डॉ.जॉनी,डॉ. वृंदा मालीवाल,डॉ. हजारी,सरदार अवतारसिंघ पहरेदार, नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, सरदार मेजरसिंघ घुमान हे प्रमूख उपस्थित होते. नागिना घाट परिसरात लंगर साहिब गुरुद्वारा च्या वतीने संत बाबा निधानसिंघ हॉस्पिटल चालवले जाते. या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा दिली जाते. लाखो लोकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेत आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा नव्याने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तिचे उद्घाटन अरदास करून करण्यात आली.
संत निधानसिंघ हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे मशीनची सुविधा उपलब्ध