हिंगोली पोलीस अधिक्षकांनी पोलीस निरिक्षक ए.आय.सय्यदचा कसुरी अहवाल पाठवला
हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना जबर मारहाण करून त्यांच्याविरुध्दच गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रक्रियेत आता मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना वाचविण्याच्या प्रयत्नात तत्कालीन पोलीस निरिक्षक ए.आय.सय्यद यांच्याविरुध्द हिंगोलीचे पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर यांनी पोलीस निरिक्षक सय्यद यांचा कसुरी अहवाल पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात पाठविला आहे. याबद्दल कन्हैया खंडेलवाल यांनी सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं।
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मार्च 2020 मध्ये तत्कालीन हिंगोली शहर वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर आणि पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांच्यात फुटेज घेण्यावरून झालेल्या वादानंतर ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या सहकारी पोलीसांसह कन्हैया खंडेलवाल यांना भरपूर मारहाण केली. या बाबत कन्हैया खंडेलवाल यांनी 30 मार्च 2020 रोजी पोलीस ठाणे हिंगोली शहरचे पोलीस निरिक्षक ए.आय.सय्यद यांनी कन्हैया खंडेलवालचा जबाब घेतला होता. पण त्यावर काही कार्यवाही केली नाही.
यानंतर कन्हैया खंडेलवाल यांनी माहितीच्या अधिकारात आपण दिलेला जबाब आणि त्यावरील कार्यवाहीची मागणी केली असता हिंगोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक यतिश देशमुख यांनी त्यांचा अर्ज निकाली काढतांना त्यात लिहिले होते की, 30 मार्च 2020 चा कन्हैया खंडेलवालचा जबाब स्टेशन डायरी नोंद क्रमांक 26 वेळ 17.35 हा अर्ज ए.आय. सय्यद यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.बर्डे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर 1 एप्रिल 2020 रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.बर्डे यांनी स्टेशन डायरी नोंद क्रमांक 18 वेळ 11.42 नुसार तो अर्ज परत ए.आय.सय्यद यांच्याकडे दिलेला आहे. याबाबत यतिश देशमुख यांनी सध्याचे पोलीस निरिक्षक पंडीत कच्छवे यांच्याकडे विचारणा केली असता ए.आय.सय्यद यांनी तो अर्ज कोठे तरी ठेवला आहे असे सांगितले. याची तपासणी कच्छवे यांनी केली. पण तुमचा जबाब सापडला नाही म्हणून तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
यासोबतच यतिश देशमुख यांनी एक चौकशी केली. त्यानुसार 30 मार्च 2020 रोजी कन्हैया खंडेलवाल आणि ओमकांत चिंचोळकर या दोघांचे जबाब ए.आय.सय्यद यांनी घेतले होते. त्यात ओमकांत चिंचोळकरच्या जबाबावार कन्हैया खंडेलवालविरुध्द गुन्हा दाखल झाला. कन्हैया खंडेलवालच्या जबाबावर कांहीच कार्यवाही झाली नाही. यावर आर.डी.बर्डे यांनी ओमकांत चिंचोळकर हे माझे वरिष्ठ अधिकारी असल्याने मी त्यांची चौकशी करू शकत नाही म्हणून तो अर्ज मी परत केला. आणि ही कार्यवाही तशीच राहिली. तेंव्हा यतिश देशमुख यांनी आपल्या अहवालात कन्हैया खंडेलवाल यांच्या 30 मार्च 2020 रोजीच्या अर्जावर उचीत कार्यवाही न करणाऱ्या पोलीस निरिक्षक ए.आय.सय्यद विरुध्द कार्यवाही होण्याचा अहवाल पोलीस अधिक्षकांना सादर केला.
या सर्व चौकशीनंतर पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर यांनी सध्या आर्थिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक अखिल इब्राहिम सय्यद यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक असतांना कन्हैया खंडेलवाल यांच्या अर्जावर कार्यवाही न करता तो जबाब गहाळ केला असे चौकशीत निष्पन्न झाल्याने तसा कसुरी अहवाल पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात पाठवून पुढील कार्यवाहीसाठी लिहिले आहे. याबाबत कन्हैया खंडेलवाल यांनी सांगितले की, मला मारदेण्यात आला, बनावट जखमा दाखवून माझ्यावर गुन्हा दाखल केला. पण आज पोलीसांनी पोलिसाला वाचविण्यासाठी सर्व बनावटपणा केल्याचे या अहवालावरून दिसते आहे त्यासाठी मी सत्य परेशान हो सकता है पण पराजित नहीं ऐवढेच सांगू इच्छीतो.
सहाय्यक पोलीस निरिक्षकाला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीस निरिक्षकाची दुकान उघडली