नांदेड(प्रतिनिधी)-अन्न सुरक्षा अधिकार्यांनी उस्माननगर येथे दोन दुकानातून ५१ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा पकडला आहे.
अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी सतिश हाके, ऋषीकेश मरेवार आणि भिसे यांनी उस्माननगर गावातील साई गणेश कन्फेशनरी या दुकानात तपासणी केली तेंव्हा तेथे प्रतिबंधीत गुटख्याचे १९२ पॉकीट, किंमत २२ हजार ९०० रुपये असे साहित्य सापडले. या दुकानाचे चालक दिनेश पंडीत भोंग (२३) रा.मारतळा हे आहेत. तसेच दुसरी दुकान ओम साई कन्फेशनरी येथून अधिकार्यांनी प्रतिबंधीत गुटख्याचे २५५ पॉकिट पकडले. त्याची किंमत २८ हजार ५०० रुपये आहे. या चालक हनुमंत दादाराव ढेपे (२५) रा.मारतळा हा आहे.
दोन्ही दुकानांमधून जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत ५१ हजार ४०० रुपये आहे. याबाबत उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया वृत्तलिहिपर्यंत झाली नव्हती.
उस्माननगर गावात ५१ हजार ४०० रुपयांचा गुटखा पकडला