नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी टायर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी 1 लाख 25 हजार 147 रुपये किंमतीचे सहा टायर चोरून नेले आहेत. तसेच मौजे महागाव ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोबाईल चोरीला गेला आहे. सर्व चोरी प्रकारांमध्ये एकूण 3 लाख 61 हजार 147 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
तिरुपती दिगंबर पुल्लेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंदासिंग कॉर्नर येथे पेट्रोल पंपाशेजारी त्यांची लक्ष्मी टायर्स नावाची दुकान आहे. या दुकानातून 21-22 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी जे.के.टायर्स कंपनीचे 1 लाख 25 हजार 147 रुपये किंमतीचे सहा टायर्स चोरून नेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर अधिक तपास करीत आहेत.
भोकर तालुक्यातील महागाव येथे 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान बालाजी चंपतराव सावंत यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी ते घर फोडले त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे किंमत 2 लाख 1 हजार रुपये असा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
रवि हरिश्चंद्र कांबळे यांची 25 हजार रुपये किंमतीची गाडी 16 नोव्हंेंबर रोजी चोरीला गेली होती. या बाबत भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हुंडे अधिक तपास करीत आहेत. साईनाथ भाऊराव बारबेले हे 23डिसेंबर रोजी भंगारलाईन कमानीजवळ आपली गाडी उभी करून गेले असतांना त्यांच्या गाडीचा उघडा काच मधून त्यांची नजर चुकवून कोणी तरी त्यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला आहे. साईनाथ बारबेले हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते ड्रायव्हर आहे. इतवारा पोलीसांनी त्यांचा गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत टायर दुकान फोडले; महागाव ता.भोकर येथे घर फोडले