
नांदेड(प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरूच आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ भजन गात कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवलेले आहे. याबाबत सुध्दा कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांना विचारणा केली तेंव्हा ते म्हणाले याबाबत बोलणी सुरु आहे. लवकरच या आंदोलनाचा शेवट होईल.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर या आंदोलक कर्मचाऱ्यांनी भजन गात आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. 18 डिसेंबरपासून सुरू झालेले हे कामबंद आंदोलन आजही सुरूच आहे. आपल्या विविध मागण्यापुर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामबंद आंदोलन मागे घेणार नाही अशी कर्मचाऱ्यांची भुमिका आहे.
याबद्दल कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांच्याकडे विचारणा केली असता शिक्षण सचिवांशी याबाबत मी पण बोललो आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भाने घोषणा होईल आणि हे आंदोलन लवकरच संपेल अशी मला आशा आहे असे सांगितले.