​ सोमश कॉलनीमधून दुपारी 6 लाख 50 हजारांची बॅग लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-नवीन मोंढा भागातील एका भुसार व्यापाऱ्यावर पार ठेवून चोरट्यांनी एचडीएफसी बॅंक ते सोमेश कॉलनी असा पाठलाग करून गाडी उभी करताच व्यापाऱ्याला बोलण्यात अडकवून त्याची 6 लाख 50 हजारांची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार दुपारी 1.10 मिनिटाच्या सुमारास घडला आहे.
नवीन मोंढा येथील राजकुमार द्वारकादास मुंदडा भुसार व्यापारी यांनी एचडीएफसी बॅंकेतून 6 लाख 50 हजार रुपये काढले. आणि आपल्या दुचाकी गाडीच्या डिक्कीत ठेवले. बॅंकेतून मुंदडा हे सोमेश कॉलनी येथील आपले नातलगाच्या घरी कांही कार्यक्रमासाठी आले. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळतच ठेवलेली होती. मुंदडा यांनी गाडी उभी करताच कांही जण त्यांच्याजवळ आले आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना बाजूला बोलावले. एवढ्यात चोरट्यांच्या दुसऱ्या साथीदारांनी त्यांच्या दुचाकी गाडीतील डिक्कीमधून 6 लाख 50 हजार रुपयांची बॅग काढून पळून गेले आहेत. राजकुमार मुंदडा यांची दुचाकी गाडी स्कुटी आहे.
या संदर्भाने वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, मोठी रक्कम बाळगून शहरात फिरत असतांना दक्षता घ्या. कारण चोरटे बॅंकेपासूनच पाळत ठेवून होते. हे या प्रकरणात दिसते आहे. तसेच कांही दिवसांपुर्वी 50 लाखांची एक बॅग चोरीला गेली होती त्यातही असेच घडले होते. तेंव्हा जनतेने जास्तीची रक्कम आपल्यासोबत असतांना अत्यंत काटेकोर दक्षता बाळगावी आणि आपल्या संपत्तीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही नागरीकाला आपल्या संपत्तीला त्रास होईल असा आभास जरी झाला त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा. पोलीस दल जनतेच्या सेवेसाठीच सदैव तत्पर असल्याचे जगदीश भंडरवार म्हणाले. याप्रकरणात बॅंक ते सोमेश कॉलनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. त्यातून कांही संशयीत गाड्यांची छायाचित्रे पोलीसांनी जारी केली आहेत. जनतेला या लोकांबद्दल कांही माहिती असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *