नांदेड(प्रतिनिधी)-धनज ता.मुदखेड येथील पांडागळे कुटूंबियांमध्ये जबर हाणामारी झाली ज्यात सहा जणांनी एकावर जिवघेणा हल्ला केला. त्यात बारड पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.
कैलास पुरभाजी पांडागळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे इतर नातलग शेतामध्ये रस्ता दुरूस्तीचे काम करत असतांना त्यांच्याच कुटूंबातील कांही जणांनी हारामखोरांनो तुम्हाला रस्ता पाहिजे काय असे ओरडून कुऱ्हाड, कत्ती, काठी आदी शस्त्राच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. यात कैलास पुरभाजी पांडागळे आणि इतर कांही जण जखमी झाले.
बारड पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 111/2021 दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 307, 504, 143, 147, 149 जोडण्यात आली आहे. बारडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.आर.तुगावे यांनी या प्रकरणातील मारहाण करणारे मारोतराव गणपतराव पांडागळे, सटवाजी मारोती पांडागळे, राजू मारोती पांडागळे, सदाशिव रामराव पांडागळे, गजानन सदाशिव पांडागळे, गणेश लक्ष्मण पांडागळे सर्व रा.धनज
पांडागळे कुटूंबियांमध्ये जिवघेणी हाणामारी ; 6 जण अटकेत