शेतकऱ्यांच्या पिकावर 47 लाख 59 हजारांचे कर्ज उचलणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या मालावर स्वत:साठी 47 लाख 59 हजार 200 रुपयांचे कर्ज काढून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द हदगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कपील बालाजीराव तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साई ऍग्रो वेअर हाऊस मानवाडी फाटा येथे 3 मार्च 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान त्यांनी व अनेक शेतकऱ्यांनी 5 रुपये प्रतिकट्टाप्रमाणे भाडे भावती तयार करून घेवून साई ऍग्रोमध्ये 399 कट्टे हळद, 59 कट्टे तुर, 990 कट्टे चन्ना असे शेती पिक ठेवले होते. शेतकऱ्यांचे पिक असतांना वेअर हाऊसचे प्रशांत पंडीतराव कदम आणि चेतन बाभुळकर या दोघांनी भाडेतत्वावर साठवणूक करून ठेवलेल्या या शेत मालाच्या तुलनेत बॅंकेतून 47 लाख 59 हजार 200 रुपये किंमतीवर कर्ज काढले. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 388/2021 दाखल केला आहे. त्यात भारतीय दंड संहितेची 420, 406 आणि 34 कलमे जोडण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *