
नांदेड(प्रतिनिधी)-एस.टी.महामंडळातील कर्मचारी भिमराव नागोराव सदावर्ते यांनी आज आपल्या राहत्या घरी वसरणी भागातील भुखंडावर कच्या घरात नॉयलॉन दौरीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
नागेश भिमराव सदावर्ते यांचे वडील भिमराव नागोराव सदावर्ते हे एस.टी.विभागात वाहक या पदावर किनवट आगारात कार्यरत होते. आज सकाळी 9 वाजता नागेश सदावर्तेने त्यांच्या वसरणी येथील भुखंडावर विटा रचून तयार करण्यात आलेल्या एका रुममध्ये वडीलांचा मृतदेह दौरीला लटकेला पाहिला. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यू क्रमांक 124/2021 दाखल केला असून पुढील तपासाची जबाबदारी महेश कौरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
भिमराव नागोराव सदावर्ते यांचे वय 57 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगी असा परिवार आहे. एस.टी.विभागातील अनेक वाहक, चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांच्या घरी भेट दिली.