नांदेड(प्रतिनिधी)-जुना मोंढा भागातील रेवनवार या कापड दुकानात आज 26 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 3 वाजेचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला. या दुकानातून चोरी झाली आहे. पण दुकान मालकाने तक्रार नोंदवलेली नाही.
आज पहाटे 3 वाजेच्यासुमारास जुना मोंढा भागातील एक चोर हातात बॅटरी घेवून अत्यंत हळूवारपणे एक-एक ड्राव्हर तपासत होता. या त्या चोरट्याने आपल्या एका हातात बॅटरी धरलेली होती आणि तो पैसे शोधून एका कॅरीबॅगमध्ये टाकत होता. हा व्हीडीओ जवळपास 2 मिनिटे 50 सेकेंदाचा आहे. ही दुकान इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतेे म्हणून त्यांच्याकडे सायंकाळी 7 वाजता विचारणा केली असता आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आली नाही असे सांगण्यात आले. घडलेली घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असतांना सुध्दा तक्रार देण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कांही ठिकाणी चोरट्याचा चेहरा पुर्णपणे दिसतो.