नांदेड(प्रतिनिधी)-52 पत्यांचा जुगार दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाद होईल अशा ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. 52 पत्यांचा जुगार एकाच जागी नसून तीन जागी आहे. पण याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे भरण देण्याचा प्रश्न उदभवत नाही.
नांदेडच्या कांही नामांकित जुगाऱ्यांनी आपले जुगार अड्डे बदलून-बदलून सुरू केले तरी नांदेड पोलीसांनी त्यांची नेहमीच वाणवा केली. त्यामुळे नांदेड जिल्हा सोडून दुसरीकडे सुध्दा या जुगाराचा दुकाने थाटण्यात आली. त्याही पोलीसांनी या जुगाऱ्यांना आपल्या हद्दीतून तडीपार केले. त्यामुळे दररोज येणारे पैसे बंद झाले आणि जुगाऱ्यांनी त्यासाठी नवीन-नवीन योजना आखण्यास सुरूवात केली. कधीकाळी आपले खास असणारे कामगार युवक सोडून नवीन कामगार युवक शोधले आणि त्यांच्यासोबत हा 52 पत्यांचा जुगार सुरू केला.
अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावडेवाडी गाव संपताच एक कॅनॉल आहे. या कॅनॉल शेजारी जुगार चालविणाऱ्यांनी आपले गुलाम पाडला आहे. या ठिकाणी खाण्या-पिण्याची सोय नाही. म्हणून एक खास खानसामा बोलावण्यात आला आहे. तो या जुगाऱ्यांना शाकाहारी आणि मांसाहारी अशी खाण्या-पिण्यांच्या वस्तुंची सोय करून देतो आणि हा जुगार अड्डा बिनदिक्कत सुरू आहे. सोबतच नैसर्गिक नाव असलेल्या एका धाब्याच्या जवळ दुसरा जुगार अड्डा सुरू आहे. तेथे ढाब्याची सोय असल्याने जुगाऱ्यांना खाण्यापिण्याची सोय तयार आहे. अशाच प्रकारचा एक दुसरा ढाबा स्वत:चे राज्य अशा आशयाचे नाव असलेल्या ढाब्याजवळ सुरू आहे. त्यामुळे तेथेही खाण्या-पिण्याची सोय आहे आणि जुगाऱ्यांना अशा प्रकारच्या सर्व सोयी उपलब्ध असल्याने या जुगार अड्ड्यावर येणाऱ्या जुगाऱ्यांची संख्यापण छान आहे आणि त्यामुळे हा धंदा सुरू आहे. या तिन्ही जुगार अड्ड्यांकडून कोणतीही भरण दिली जात नाही त्यामुळे त्यांचा धंदा जोरात सुरू आहे. हे तीन्ही 52 पत्यांचे जुगार अड्डे नांदेड-पुर्णा रोडवर थाटलेले आहेत.