नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी 27 डिसेंबरच्या रात्री 2 वाजता पकडलेल्या एका वाळू ट्रक बाबत तहसीलदार नांदेड यांना पत्र पाठवून 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. तरी अद्याप तहसील कार्यालयाने त्या वाळू ट्रकवर कोणतीच कार्यवाही केलेली नाही. आज वाळूच्या संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते अशी खात्रीलायक माहिती सुध्दा आहे.
दि.26 डिसेंबर रोजीच्या रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात डीओअधिकारी पदावर पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे कार्यरत होते. आपले पोलीस कर्मचारी कानगुले आणि पवार यांच्यासोबत नाईटगस्त करत असतांना चंदासिंघ कॉर्नरजवळ ुचुकीच्या दिशेने आलेला ट्रक क्रमांक टी.एस.16 यु.सी.7714 ला रोखले. हा ट्रक 12 टायरचा आहे. या ट्रकवर ताडपत्री लावलेली होती. पोलीसांनी पाहिले तेंव्हा यामध्ये वाळू भरलेली होती.या ट्रकचा चालक माधव साईनाथ मेडेवार रा.बिलोली हा होता. या गाडीचा मालक मिलिंदराज जळबाजी सोनकांबळे रा.बारुळ कौठा ह.मु.निजामाबाद तेलंगणा हा असल्याचे सांगण्यात आले. या ट्रकमध्ये बिलोली येथील येसगीची लाल वाळू भरलेली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या ट्रकच्या गौण खनिज पावतीचे पोलीसांनी निरिक्षण केले असता ती पावती 16 डिसेंबर 2021 ची होती. पण तो पोलीसांना 27 डिसेंबरच्या रात्री सापडला. या पावतीवर 8 तासात गंतव्य स्थळावर पोहण्याची सिमा लिहिलेली होती.
27 डिसेंबर रोजीच नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे यांनी तहसीलदार नांदेड यांना पत्र पाठवून सापडलेल्या अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन, चालक, आणि मालक यांच्याविरुध्द गौण खनिज कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही व्हावी असे विनंती करणारे पत्र दिले आहे. आज दि.28 डिसेंबरचे दिवसांचे दुसरे सत्र पुढे गेले आहे तरीपण तहसील कार्यालयाने या अवैध वाहतुक करणारे गाडीवर कोणतीच कार्यवाही केल्याचे दिसले नाही. आज दि.28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अवैध वाळू वाहतुक, वाळू चोरी या संदर्भाने बैठकीचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने पकडलेल्या अवैध वाळू ट्रकवर 28 तासानंतर सुध्दा तहसील कार्यालयाने कार्यवाही केली नाही