नांदेड(प्रतिनिधी)-एका फायनान्स कंपनीचे कर्जदारांकडून वसुल केलेली रक्कम व बनावट दरोड्यात अपहार केलेली रक्कम फायनान्स कंपनीच्या खात्यात न भरणाऱ्या व्यक्तीविरुध्द लोहा पोलीसांनी विश्र्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
भारत फायनान्सीयल कंपनीचे व्यवस्थापक मारोती माधव गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 दरम्यान या कंपनीचे काम करणारा सचिन प्रकाश आडे रा.महाराणा प्रतापनगर लातूर याने कंपनीच्या कर्जदाराकडून वसुल केलेली रक्कम आणि बनावट दरोडा दाखवून त्यात अपहार केलेली रक्कम अशी एकूण 2 लाख 88 हजार 788 रुपये कंपनीच्या खात्यात न भरता कंपनीचा आणि कर्जदारांचा विश्र्वास घात केला आहे.
लोहा पोलीसांनी या तक्रारीनुसार 262/2021 कलम 408 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार किरपणे हे करीत आहेत.
फायनान्स कंपनीचे 2 लाख 88 हजारांचा अपहार करणाऱ्याविरुध्द गुन्हा