नांदेड (प्रतिनिधी)-28 डिसेंबर रोजी हळदीच्या ठिपक्यांच्या स्वरुपात मोहपूर ता.किनवट येथे गारा पडल्याचा अहवाल मोहपूरचे ग्रामसेवक यांनी तहसीलदार किनवट यांना पाठवला आहे. निसर्गाने दाखवलेली ही नवीन कृती नक्कीच संशोधनाची आहे.
दि.28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ग्राम पंचायत मोहपूर ता.किनवटच्या हद्दीत गारा पडल्या. या गारांनी नैसर्गिक नुकसान तर केलेच पण गारांना लोकांनी पाहिले तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पांढऱ्या रंगाच्याच गारा पडतात ही माहिती सर्व सामान्य आहे. पण मोहपुर येथे पडलेल्या पांढऱ्या गारांसह कांही गारा हळदीच्या रंगाच्या होत्या. हळदीचे पाणी शिंपडले तर कसे दिसेल त्याप्रमाणे गारांमध्ये असा कांही पिवळा-पिवळा भाग दिसत होता. मोहपूरच्या ग्रामसेवकांनी त्वरीत प्रभावाने या हळदी रंगाच्या गारांची माहिती आपल्या अहवालाद्वारे किनवटच्या तहसीलदारांना दिली आहे.
निसर्ग काय कमाल करेल याचा कांही नेम नसतो, आजही निसर्गाला पुर्णपणे ओळखता आलेले नाही. अशा परिस्थितीत या पिवळ्या ठिपक्यांच्या शोध होण्याची नक्कीच गरज आहे.
किनवट तालुक्यात हळदी रंगाच्या गारा पडल्या