दोन घर फोडले, मोबाईल टावरच्या बॅटऱ्या चोरल्या
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वर्धमाननगर भागात एक घर फोडण्यात आले आहे. मौजे मांजरम ता.नायगाव येथे एक घर फोडण्यात आले आहे.तसेच एका मोबाईल टॉवरमधून चोरी झाली आहे, एका नोकराने ट्रकमधून कोंबड्यांनी खायचे धान्य चोरले आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 8 लाख 21 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
शहरातील आयोध्यानगरी, वर्धमाननगर येथे राहणारे दिपक महारुद्र गंगातीरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 डिसेंबरच्या रात्री 8.30 ते 28 डिसेंबरच्या पहाटे 7.30 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे चॅनलगेट, लाकडी दार तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि एक होमथेटर टी.व्ही. असा एकूण 1 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक घुगे यांना देण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपींचा सुगावा आम्हाला लागला असल्याची माहिती भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी दिली.
मांजरम ता.नायगाव येथील बालाजी रामचंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ते आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेले. 2.45 वाजता परत आले तेंव्हा त्यांचे घर फोडलेले होते. त्यातून बाहेर गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी लाकडी कपाट तोडून कपाटातील रोख रक्कम 2 लाख 50 हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिणे 1 लाख 74 हजार रुपयांचे असा ऐवज चोरून नेला आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एस.एस.बाचावार अधिक तपास करीत आहेत.
अनिल नारायण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जलधारा, पांगरी तांडा शिवारात असलेल्या एका खाजगी मोबाईल टावर कंपनीमधील दोन ठिकाणच्या एकूण 11 बॅटऱ्या 25 ते 26 डिसेंबर दरम्यान चोरून नेल्या आहेत. या बॅटऱ्यांची किंमत 2 लाख 75 हजार रुपये आहे. ईस्लापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख करीत आहेत.
अनवर हैदर शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या ट्रक क्रमंाक एम.एच.40 बी.एल.8418 मधून त्यांच्या ड्रायव्हरने कोंबड्यांचे खाण्याचे खाद्य भरलेले 3 क्विंटल खाद्य चोरून नेले आहे. या खाद्याची किंमत 18 हजार रुपये आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक अशोक इंगळे करीत आहेत.
8 लाख 21 हजारांचा ऐवज चार चोऱ्यांमध्ये लंपास