नांदेड (प्रतिनिधी) – राज्य मार्ग 61 नाळेश्वर – हस्सापुर -नांदेड रस्त्यावरील प्रमुख जिल्हा मार्ग- 84 किमी 0/400 येथील काम सुरु करण्यात येणार आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस दि. 29 एप्रिल 2022 पर्यंत प्रतिबंध केला आहे. या रस्त्यावरील वाहनास पर्यायी मार्ग म्हणून जड वाहनांसाठी पश्चिम वळन रस्ता श्री खंडेराव होळकर चौक येथून असर्जन मार्गे नांदेड व नाळेश्वर कडे ये-जा करतील. तर दुचाकी, हलके वाहनांसाठी ग्रामीण मार्ग-70 वरुन नोबेल कॉलनी मार्गे नांदेड व नाळेश्वरकडे ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी याबाबत अधिसूचना निर्गमीत केली आहे.
Related Posts
1 लाख 80 हजारांचे धनादेश प्रकरण ; आरोपीची मुक्तता
नांदेड(प्रतिनिधी)-आरोपीचा धनादेश तुमच्याकडे कसा आला याचे समिक्षण केल्यानंतर परक्राम्य संकीर्ण अभिलेख (एन.आय.अँक्ट) कायद्याप्रमाणे या प्रकरणातील 1 लाख 80 हजारांचा धनादेश…
स्थागुशाने दहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून 10 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार,…
मुलीने आपल्या वडीलांवर अंतिमक्रिया करून आपल्या जीवनाची जबाबदारी पुर्ण केली
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या वडीलांची अंतिमक्रिया करून एका युवतीने आपल्या जन्माचे पाण फेडले. या मयत व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा होता. मुलगा…