
नांदेड(प्रतिनिधी)- यंदाचा 31 डिसेंबर अर्थात नवीन वर्षाचे आगमन नागरीकांनी ओमीक्रॉन या संकटाच्या पार्श्र्वभूमीवर घरातच राहुन साजरा करायचा आहे. या निर्णयाला न मानले नाही तर कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेले अशा प्रकारच्या मार्गदर्शक सुचना गृहविभागाच्या परिपत्रकानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जारी केल्या आहेत.
गृहविभागाचे उपसचिव यांनी 31 डिसेंबर 2021, वर्षाचा शेवटचा दिवस तसेच 2022 या नवीन वर्षाच्या सुरूवातीचा पहिला क्षण साजरा करतांना ओमीक्रॉन या विषाणु प्रजातीचा धोका लक्षात घेवून साजरा करायचा आहे. ओमीक्रॉन विषाणूचे संक्रमण अत्यंत तिव्रगतीने नागरीकांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. म्हणून नव वर्ष साजरे करतांना दक्षता घेण्यास सांगण्यात आल्या आहेत.
जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे आगमन स्वागत करतांना नागरीकांनी हा समारोप घरीच साजरा करावा. अगोदरच रात्री 9 ते सकाळी 6 वाजेदरम्यान 5 पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र येण्यास बंदी आहे. त्यानुसार याही दिवशी साजरे होणारे उपक्रम सार्वजनिक ठिकाणी करायचे नाहीत. बंदीस्त सभागृहात 50 टक्के मर्यादा आणि खुल्या जागेत 25 टक्के मर्यादा उपस्थिती याला परवानगी आहे. गर्दी करायची नाही, मास्क वापर, शारीरिक अंतर आणि निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. दहा वर्षा खालील मुले आणि 60 वर्षावरील नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे. कोणतेही धार्मिक, सांस्कृती कार्यक्रम आणि मिरवणूक काढण्यात येवून नये. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक नागरीक धार्मिक स्थळी जातात. त्या ठिकाणी होणारी गर्दी अत्यंत नियंत्रीत पध्दतीने आणि कोविड नियमावली नुसार राखण्यात यावी. कोणतीही फटाक्यांची आतिषबाजी होणार नाही. ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळले जावे. यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी 31 डिसेंबरला रामराव आणि 1 जानेवारी 2022 ला स्वागत करतांना काटेकोरपध्दतीने काम करण्याच्या सुचना या निर्देशात देण्यात आल्या आहेत.