नांदेड(प्रतिनिधी)- लाच खोरांच्या यादीत महसुल विभागाने नांदेड जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. पोलीसांचा नंबर दुसरा आहे. सन 2021 मध्ये एकूण 62 लाचखोर पकडले गेले आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार सन 2021 या वर्षात जिल्ह्यात 62 लाचखोरांना पकडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक महसुल-13, पोलीस-10, जिल्हा परिषद-05, वित्त विभाग-01, महावितरण कंपनी-04, कृषी विभाग-02, राज्य उत्पादन-02, उच्च शिक्षण विभाग-01, आरोग्य विभाग-01, शिक्षण-05, रेल्वे-01, पंचायत समिती-04, सामाजिक न्याय-01, सहकार पणण आणि वस्त्रउद्योग विभाग-01, वजने मापे-01, परिवहन महामंडळ-01, सहकार-01, विना खाते-01, ग्राम विकास-03, पशुधन विकास-01, वन विभाग-01, परिवहन(आरटीओ)-01, महानगरपालिका-01 असे 62 लाचखोर नांदेड जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण यांनी सांगितले की, जनतेने शासकीय काम करतांना कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. जेणे करून सरकारी काम करतांना लाचखोरीवर आळा बसेल.
2021 मध्ये जिल्ह्यात लाचखोरीच्या यादीत महसुल विभाग क्रमांक एकवर ; पोलीसांचा नंबर दुसरा