मयत पत्रकाराच्या गाडीचा चालक; मारेकऱ्यांमधील एक पत्रकाराच्या गाडीचा चालक
नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबरच्या मध्यरात्री न्यु इअर पार्टीमध्ये चौथ्या मजल्यावरून फेकून खुन करण्यात आलेला युवक पत्रकाराच्या गाडीचा चालक आहे. ज्या घराच्या गाडीच्या गॅलरीतून फेकून खून झाला त्या फ्लॅटचा मालक पत्रकार आहे. जो व्यक्ती या घरात राहतो तो सुध्दा पत्रकाराच्या गाडीचा चालक आहे आणि त्याच्यावर पुर्वी सुध्दा खूनाचा गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारे झालेल्या चालकाच्या खून प्रकरणातील चार मारेकऱ्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाीर प्रविण कुलकर्णी यांनी तीन दिवस, अर्थात 5 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.31 डिसेंबरच्या रात्री सिध्दीविनायक नगर बी.आर.जे.प्लॉझा या इमारतीतील चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅट क्रमांक 14 मध्ये न्यु इअर पार्टी झाली. हा फ्लॅट पत्रकार संजीव कुलकर्णी यांचा असल्याचे सांगण्यात आले. त्या फ्लॅटमध्ये माधव ग्यानबा बोलके हा त्यांचाच चालक भाड्याने राहतो. त्या दिवशी त्या पार्टीमध्ये पत्रकार सचिन मोहिते यांच्या गाडीचा चालक संतोष भालेराव (30) हा होता. त्याच्यासोबत सोपान बालाजी नेवल पाटील (33), गणेश व्यंकटराव कदम (29), माधव ग्यानबा बोलके (34) मारोती नवाजी बोलपलेवाड (28) असे चौघे होते. मद्याच्या नशेत काय झाले. हे त्यांनाच माहित. पत्रकारांनी आप आपल्या माहितीनुसार ही खूनाची बातमी प्रसिध्द केली. वैद्यकीय अहवालाप्रमाणे वरुन फेकून खून झालेल्या संतोष भालेरावच्या डोक्यावर कड्याने मारल्याची जखम स्पष्टपणे दिसते. त्यानंतर वरुन फेकून दिल्याने संतोष वामनराव भालेरावचा मृत्यू झाला.
संतोषची पत्नी श्वेता भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी संतोषचे चार मारेकरी सोपान बालाजी नेवल पाटील, गणेश व्यंकटराव कदम, माधव ग्यानबा बोलके आणि मारोती नवाजी बोलपलेवाड या चौघाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 504 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 3/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणातील सोपान नेवल पाटील याच्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात सहा गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सोबतच पत्रकार संजीव कुलकर्णीच्या गाडीचा चालक आणि यातील मारेकरी माधव ग्यानबा बोलकेविरुध्द सुध्दा खूनाचा गुन्हा दाखल होता हा त्याच्या नावावर दुसरा खूनाचा गुन्हा आहे अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे.
आज सुनिल भिसे, त्यांचे सहकारी पेालीस अंमलदार शेख युसूफ, मारोती मुसळे, कदम, ओमप्रकाश कौडे, गर्दनमारे, आणि संतोष वच्चेवार यांनी पकडलेल्या चार मारेकऱ्यांना न्यायालयात हजर केले. घडलेला खूनाचा प्रकार आणि त्यासाठी तपासाची गरज न्यायासमोर सादर करून सुनिल भिसे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली.या प्रकरणात चारही आरोपींच्यावतीने ऍड. यशोनिल उत्तमराव मोगले यांनी युक्तिवाद केला. युक्तीवाद ऐकून न्या.प्रविण कुलकर्णी यांनी चार मारेकऱ्यांना 5 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
न्यु इअरला आपल्या मित्राचा खून करणारे चार मारेकरी पोलीस कोठडीत