दोन दुचाकी गाड्या आणि एक लोडींग टेम्पो चोरीला गेला
नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव शहरातील एका बिअर बारमध्ये मारहाण करून तिन जणांनी 1 लाख 32 हजार रुपयांची लुट केली. त्या गुन्हेगारांना हदगाव पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. सोबतच शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 60 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या आणि 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचा एक लोडींग टॅम्पो चोरीला गेला आहे. या सर्व घटनांमध्ये 3 लाख 42 हजारांच्या ऐवजाचा विषय जोडलेला आहे.
रजानगर हदगाव येथील अनवर खान मोहम्मद अली खान हे 31 डिसेंबर रोजी रात्री साई बार हदगाव येथे जेवनासाठी गेले असतांना तेथे असणाऱ्या तिन लोकांनी त्यांना काठीने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन व रोख रक्कम 14 हजार रुपये तसेच त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीच्या गळ्यातील दोन गॅ्रम वजनाचे सोन्याचे ओम व 8 हजा रुपये रोख रक्कम लुटला आहे. या ऐवजाची एकूण रक्कम 1 लाख 32 हजार रुपये आहे. हदगाव पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 1/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 323, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एस.टी.गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ईस्लामपूरा, माळटेकडी परिसरातून 26 डिसेंबर रोजी रात्री 11.30 ते 27 डिसेंबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान शेख नन्हुमियॉं शेख करीम यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 यु.8899 चोरीला गेली. तसेच 15 डिसेंबरच्या रात्री 11 ते 16 डिसेंबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान खय्युम प्लॉट नांदेड येथून मोहम्मद वाजीद मोहम्मद अकबर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 यु.4050 चोरीला गेली. या दोन्ही गाड्यांची किंमत 60 हजार रुपये आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार शेख रसुल करीत आहेत.
माळटेकडी परिसरातूनच शेख सलीम शेख मुनशी यांनी 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता आपला लोडींग टेम्पो क्रमांक एम.एच.26 एच.9194 हा उभा केला. 24 डिसेेंबरच्या पहाटे 3 वाजेदरम्यान हा टेम्पो चोरीला गेला. या टेम्पोची किंमत 1 लाख 50 हजार आहे. पोलीस अंमलदार भिसाडे अधिक तपास करीत आहेत.
31 डिसेंबरच्या रात्री हदगाव येथे बिअरबारमध्ये झाला राडा ; 1 लाख 32 हजारांच्या ऐवजाची लुट