नांदेड(प्रतिनिधी)- हदगाव येथे एक घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 10 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हदगाव ते उमरखेड रस्त्यावरील गोजेगाव शिवारातून एका मोबाईल कंपनीच्या बॅटऱ्या चोरण्यात आल्या आहेत. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 52 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
शिवकुमार लक्ष्मण बिच्चेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 डिसेंबरच्या रात्री 10 ते 11 या वेळेदरम्यान त्यांनी आपल्या दाराची कडीलावून गच्चीवर जेवण करत असतांना कोणी तरी त्यांच्या घराची कडीकाढून त्यातील ओटीडीआर कंपनीची एक मशीन 1 लाख 10 हजार 179 रुपयांची चोरून नेली आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
उमरखेड हदगाव रस्त्यावरील एका मोबाईल टावरच्या कार्यालयातून 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान 48 व्होल्टच्या तीन बॅटऱ्या 12 हजार रुपये किंमतीच्या कोणी तरी चोरल्या आहेत. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार भिसे हे करीत आहेत.
शहरातील वसंतनगर भागातून 1 ते 2 जानेवारीच्या रात्री सागर प्रकाशराव सवराते यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26-4243 ही 12 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शेख इब्राहिम अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत शिवाजीनगर भागातील गुंजकर यांच्या घरासमोर ठेवलेली मंगेश दिगंबर गव्हाणे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.0658 ही 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार मठदेवरु हे करीत आहेत.
चोऱ्यांच्या घटनेत 1 लाख 94 हजार 169 रुपयांचा ऐवज लंपास