शहरातील व्यक्तीगत परसबाग, गच्चीवरील बाग असणाऱ्यांनी माझे घर-हरित घर या स्पर्धेत सहभागी व्हा-महापौर जयश्री पावडे

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात पर्यावरण पुरक कामांना वाव देता यावा आणि सर्वसामान्य माणसाने हरितक्रांती घडविण्यात आपला सहभाग नोंदवावा म्हणून महानगरपालिकेच्यावतीने माझे घर-हरित घर अशा संकल्पनेची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आज महापौर जयश्री पावडे यांनी केली असल्याीच महिती पत्रकारांना दिली. यामध्ये आजपर्यंत ज्यांनी आपल्या घरात हरित दृष्टीकोणातून झाडांच्या लागवडीचा सहभाग घेतलेला आहे, त्यांना जोपासले आहे अशा लोकांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांना पारितोषकपण दिले जाणार आहे.
महापौर जयश्री पावडे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की,सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आपल्या घरात उत्कृष्ट परसबाग, गच्चीवरील बाग, आपल्या घराच्या परिसरात जोपासलेली विविध झाडे, माझ घर-हरित घर या स्पर्धेची सुरूवात केली आहे. माझी वसुंधरा अंतर्गत महानगरपालिका, वृक्षमित्र फाऊंडेशनच्यावतीने ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
ऑनलाईन पध्दतीने गुगलवर या स्पर्धेत सहभाग घेतल्याचा अर्ज भरायचा आहे. आपल्या घरात शास्त्रशुध्द पध्दतीने केलेली झाडांची लागवड, घरात भाजीपाल व फळ झाडांचा समावेश, बागेची रचना, जैविक खतांचा वापर आणि घरातील झाडांची सजावट या अनुक्रमाने स्पर्धेतील बागांचे निरिक्षण केले जाणार आहे. ऑनलाईन पध्दतीने छायाचित्रांच्या आधारे स्पर्धेत सहभागी झालेल्या कुटूंबाची माहिती जमा करण्यात येईल. 15 जणांची अंतिम फेरीत निवड होईल. त्या 15 कुटूंबांना तज्ञ परिक्षक स्वत: भेटी देतील आणि त्यांच्या बागांचे निरिक्षण करतील. यासाठी  दि.3 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान स्पर्धेचा अर्ज भरायचा आहे. 15 ते 20 जानेवारी दरम्यान ऑनलाईन फोटो गुगलवर उपलब्ध करून द्यायचे आहेत. 20 ते 24 जानेवारी दरम्यान प्राथमिक फेरीत निवडलेल्या स्पर्धकांच्या घरी परिक्षक भेट देतील.
त्यानंतर या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा होईल. त्यात प्रथम क्रमांकास 21 हजार, द्वितीय क्रमांकास 15 हजार, तृतीय क्रमांकास 11 हजार आणि प्रोत्साहनपर 2 हजार रुपयांची तीन बक्षीसे देण्यात येतील. सर्वच पारितोषिक विजेत्यांना रोख रक्कमेसह स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात येईल. गुगलवर अर्ज भरतांना कोणास कांही अडचण आल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक 9890136510, 9923407046  आणि 9096304978 यावर कॉल करून मदत घेता येईल.
जास्तीत जास्त लोकांनी या माझे घर हरीत घर या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि आपला परिसर स्वच्छ राहिल यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा मनपा महापौर जयश्री पावडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *