कंधार तालुक्यात केंद्रे कुटुंबीयांनी महिलेचा विनयभंग केला

सरपंचाने केला महिलेचा विनयभंग
नांदेड,(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकीत अडथळा आणत असलयाचे कारणांवरून  कंधार तालुक्यातील एका गावात काही  जणांच्या जमावाने एका महिलेची अब्रू वेशीवर टांगत त्यांच्या घरातील वाहनांचे नुकसान केले आहे. कंधार पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
                            कंधार तालुक्यातील एका ३३ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गावातील सरपंच शिवम राजू केंद्रे हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात महिलेचे पती अडथळा आणत आहेत म्हणून जवळपास १० साथीदारांसह त्या महिलेच्या घरावर हल्ला केला.हल्ल्याची घटना दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. महिलेच्या घरावर हल्ला झाल त्यावेळी जमावाने महिलेला अब्रू नुकसान करणारे अनेक कृत्य केले.सोबतच त्यांच्या मालकीची एक चारचाकी गाडी आणि दोन दुचाकी गाडयांना लाकडाच्या दांडक्याने जबर प्रहार करून त्या गाड्यांचे नुकसान केले.ज्यामुळे १ लाख ९५  हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
                               महिलेच्या तक्रारीनुसार कंधार पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३/२०२२ भारतीय  संहितेच्या कलम ४५२,३२४,३५४,३५४ (ब),१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६,४२७ नुसार दाखल केला आहे. कंधारचे पोलीस निरीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा पोलीस उप निरीक्षक इंद्राळे यांच्याकडे देण्यात आला आहे.या गुन्ह्यात आरोपीच्या सदरात राजू माधवराव केंद्रे,त्यांचे पुत्र शिवम राजू केंद्रे आणि सत्यम राजू केंद्रे तसेच सुग्रीव नामदेव केंद्रे आणि त्यांच्या सोबत इतर चार पाच लोक सुद्धा होते असे लिहिलेले आहे.अद्याप वृत्त लिहीपर्यंत या गुन्ह्यातील आरोपीना अटक झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *