वेळोवेळी निवेदन,उपोषण करुनही बारा वर्षा पासुन प्रशासनाने घेतली नाही दखल…
अतिक्रमण न काढल्यास येत्या 26 जानेवारी रोजी पुन्हा आत्मदहन करणार….
ईस्लापुर(प्रतिनिधी)- प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सेवानिवूत्त पोलीस अधिकाऱ्यावर आत्मदहन करण्याची वेळ येत असुन गोकुंदा येथील प्लाँटला जाणाया सार्वजनिक रोडवरिल अतिक्रमण न काढल्यास येत्या 26 जानेवारी,बुधवार रोजी पुन्हा आत्मदहन करण्याचा इशारा तल्हारी तांडा येथील सेवानिवूत्त वरिष्ट गुप्त वार्ता अधिकारी गंगाधर राठोड यांनी दिला आहे.
तल्हारी तांडा येथील रहिवासी असलेले सेवानिवूत्त वरिष्ट गुप्त वार्ता अधिकारी गंगाधर मुनसिंग राठोड यांचे गोकुंदा ता. किनवट या ग्रामपंचायतच्या हदीतील वार्ड क्र.4 मध्ये 33 बाय 40 चे भूखंड असुन,मालमत्ता क्र.1480/28 आहे.या भूखंडावरील 15 फुट सार्वजनिक रस्ता असुन या रस्त्यावर शेजारी असलेले दिलीप उपलेंचवार यांनी रोडवर अतिक्रमण केले आहे.तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राठोड यांच्या जागेवर केरकचरा,सांडपाणी सोडुन प्लाँटवर जाण्यास अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सदरिल सार्वजनिक रस्त्यावर उपलेंचवार यांनी अतिक्रमण केल्याने राठोड यांना त्यांच्या प्लाँटवर जाण्यासाठी,येण्यासाठी व बांधकाम करण्यासाठी रस्ता नसल्याने अतोनात त्रास होत आहे.
सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस वरिष्ट गुप्त वार्ता अधिकारी गंगाधर राठोड यांनी गोकुंदा ग्रांमपंचायत,गटविकास अधिकारी प.स.किनवट,सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट,मुख्य कार्यकारी जि.प.नांदेड यांना गेल्या बारा वर्षा पासुन लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
तर याच मागणीसाठी गेल्या 26 जानेवारी 2021 रोजी नांदेड जिल्हा परिषद कार्यालया समोर उपोषणास देखील बसले होते.
यावेळी गोकुंदा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी एका महिण्यात सदरिल अतिक्रमण काढण्याचे लेखी पत्र दिले होते.
अतिक्रमण काढण्या बाबत सदरिल ग्रामसेवकाने लेखी पत्र देवुनही व अतिक्रमणा बाबत प्रशासनाला वारंवार लेखी निवेदनाव्दारे मागणी करुनही प्रशासन एका सेवानिवूत पोलीस अधिकायांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने सदरिल सार्वजनिक रस्त्यावरिल अतिक्रमण काढण्यासाठी येत्या 26 जानेवारी 2022 रोजी प्रशासकिय कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा तल्हारी तांडा येथील सेवानिवूत्त वरिष्ट गुप्त वार्ता अधिकारी गंगाधर राठोड यांनी दिला आहे.