नांदेड,(प्रतिनिधी)- आज बुधवारी कोरोना विषाणूने 45 नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येने शतक पार केले आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी घसरली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 5 जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज 45 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
खाजगी रुग्णालय- 01 अश्या रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 87888 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 96.95 टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-37, बिलोली-01, हदगाव -01, कंधार-02, अकोला-01,देगलूर-01,मुदखेड-01, नायगाव-01 असे आहेत.
आज 1032 अहवालांमध्ये 981 निगेटिव्ह आणि 45 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 90646 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 41 आणि 04 अँटीजेन तपासणीत असे एकूण 45 रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल 00 प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 06 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत.
आज कोरोनाचे 103 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -88, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-01,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-08 खाजगी रुग्णालयात- 04, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-02 असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात 03 रुग्ण आहेत.
जानेवारीच्या सुरूवातीपासून देशभर कोरोना विषाणुने आपला उद्रेक वाढवला. कमी जास्त त्याच प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यात किंबहुना नांदेड शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव दिसत आहे. त्यामुळे आता तरी जनतेने पुर्ण दक्षता बाळगत कोरोना नियमावलींचे पालन करत काम करण्याचे गरज आहे. जेणे करून जगाऐवजी आपल्या कुटूंबाचा विचार पहिल्यांदा करा त्यात जगाच्या कल्याणाचा सुध्दा विचार आहे असे समजून कोरोना नियमावलीनुसार आपले जीवन जगा, सुरक्षीत राहा आणि इतरांना सुरक्षीत ठेवा अशी विनंती वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने करण्यात येत आहे.
एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात 4.36 टक्के नवीन कोरोना रुग्ण ; एकूण नवीन रुग्णांच्या तुलनेत मनपा हद्दीत 82 टक्के रुग्ण