
नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील शारदा नगर भागात एका दुचाकीस्वाराचा पाठलाग करुन त्याला अडवून तीन दुचाकी स्वारानी त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
आज दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शारदानगर भागात झालेल्या एका खून घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता त्यात एक दुचाकीस्वार जात असतांना त्याच्या पाठीमागून तीन जण एका दुचाकीवर बसून आले.त्यानी एकट्या दुचाकीस्वाराचा रस्ता आडवला. ते तीघे त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.तो युवक पळापळ करीत होता पण तीघा हल्लेखोरांनी त्यास पकडून त्याला तिक्ष्ण हत्याराने भोकसून त्याचा खून केला. मरण पावलेल्या युवकाचे नाव विशाल रमेश धुमाळ वय 22 आसे आहे. वृत्त लिही पर्यंत या घटनेच्या संदर्भाने गुन्हा दाखल झालेला नाही. घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी प्राप्त केले आहेत.मारहाण करुन युवकाचा खून करणारे मारेकरी पोलीस शोधत आहेत.
