संतोष भालेरावचा खून चौघांनी नव्हे तर सात जणांनी केला आहे

नांदेड,(प्रतिनिधी)- 31 डिसेंबरच्या मध्यरात्री न्यु इअर पार्टीमध्ये आपल्या मित्राचा खून करणाऱ्या चार मारेकऱ्यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मयुरा यादव यांनी या चौघांची पोलीस कोठडी 8 जानेवारी 2022 पर्यंत अशी तीन दिवस वाढवून दिली आहे.याच पोलीस कोठडी यादीत भाग्यनगर पोलिसांनी मारेकऱ्यांनी यादीत तीन नावे वाढवल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे.
                       31 डिसेंबर रोजी रात्री सिध्दीविनायकनगर भागातील फ्लॅट क्रमांक 14 मध्ये न्यु इअर पार्टी झाली. या पार्टीमध्ये संतोष वामनराव भालेराव (30) याला सोपान बालाजी नेवल पाटील (33), गणेश व्यंकटराव कदम(29), माधव ग्यानबा बोलके (34), मारोती नवाजी बोलपल्लेवाड(28) या चौघांनी मारहाण करून संतोष भालेरावला  चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. याबाबत आज चार मारेकऱ्यांची पोलीस कोठडी ८ जानेवारी पर्यंत वाढली आहे.
                         न्यायालयातील घटनाक्रम समाप्त झाल्यानंतर प्राप्त झालेली माहिती अत्यंत खळबळजनक आहे.दारूच्या मजेत केलेला हा खून चार जणांनी नव्हे ते सात जणांनी केलेला आहे. भाग्यनगर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये तानाजी नेवल पाटील,अंगद नेवल पाटील आणि शंकर नेवल पाटील अश्या तीन मारेकऱ्यांनी नावे वाढवलेली आहेत.त्या दिवशी घडलेल्या प्रकारात आज नावे वाढवलेले गुन्हेगार हजर होते असे प्रत्यक्ष घटनास्थळावरील लोक सांगतात.मग ३१ डिसेंबर पासून हे तीन मारेकरी कोणाच्या संपर्कात होते,कोणच्या आसऱ्यात होते याचाही शोध झाला तर जास्त छान होईल असे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *