
सत्ताधाऱ्यांना जे छापू नये असे वाटते, ते छापणे म्हणजे पत्रकारिता. पत्रकारितेमध्ये जर पत्रकार प्रस्थापित पक्षांची गुलामगिरी करत असतील तर ते जनसामान्यांचा आवाज कधीच होऊ शकत नाहीत.आजची बहुतेक वर्तमानपत्रे हे राजकिय पुढाऱ्यांच्या किंवा त्यांच्या चेल्या चमचाच्या मालकीची आहेत आणि बहुतांश पत्रकार (अपवाद असणाऱ्यांची मनस्वी क्षमा ) म्हणजे त्याच्या दावणीला बांधलेले सोयीची भुमिका मांडणारे पाळीव पत्रकार व वृत्तवाहीन्यां विषयी तर न बोललेलच बर पैसा फेको तमाशा देखो मग लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सलाम. धारधार लेखणीला सलाम, कॉलममधल्या फेकणीला सलाम. स्तंभ विकत घेऊ पाहणाऱ्या भेकडांना सलाम, स्तंभावर चढलेल्या माकडांना सलाम. फेक ला बी सलाम अन् रोखठोकला बी सलाम.

आजच्या दर्पणदिनानिमित्त नेमक्या कुणाला शुभेच्छा द्याव्यात..? लोकशाहीच्या किडलेल्या चौथ्या खांबाला की सडलेल्या लाळघोट्या पत्रकारीतेला सत्त्याच्या बाजूने लढतांना आयुष्य पणाला लावणाऱ्यांना विनम्र अभिवादन आणि वादळातही नीतिमत्तेसह तत्व जपणाऱ्या मुठभर निर्भीड पत्रकारांना सलाम.
म्हणूनच अश्या प्रसंगी भारतात जन्म घेतलेल्या आणि पाकिस्तानात मृत्यू झालेल्या सआदत हसन मंटो यांची आठवण येते.सत्य लिहण्याच्या नादात त्यांना शेवटी अखेर डिप्रेशन झाले.मग ते बहुतांश पत्रकारां प्रमाणे दारुच्या आहारी गेले आणि किडन्यांनी अखेर उत्तर दिलेच आणि सआदत हसन मंटो यांचा मृत्यू झाला.
-जगदीश का. काशिकर,ठाणे