शहा-निशा करून पत्रकारांनी बातमी प्रकाशीत करावी-किशोर स्वामी

नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारांकडे कोणत्याही प्रकारची माहिती आल्यानंतर त्याची शहा-निशा करून ती बातमी प्रकाशीत करावी अशी अपेक्षा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी व्यक्त केली.
आज 6 जानेवारी पत्रकार दिन निमित्ताने आणि मराठीतील आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेच्यावतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त डॉ.बाबासाहेब मनोहरे, सभागृह नेता ऍड. महेश कनकदंडे, विजय येवनकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना किशोर स्वामी म्हणाले बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या पत्रकारीतेला आज चालवतांना बऱ्याच अडचणी आहेत. या अडचणीतून मात करतांना आलेल्या प्रत्येक माहितीची शहा-निशा करून पत्रकारांनी बातमी प्रकाशीत करावी अशी माझी अपेक्षा आहे.
या प्रसंगी आज सोशल मिडीयाद्वारे चालणाऱ्या पत्रकारीतेबद्दल बोलतांना मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने म्हणाले माझा नंबर पहिला लागावा ही घाई आता सर्वांना झाली आहे. त्यामुळे अनेकवेळेस चुकीच्या माहितीवर आधारीत बातम्यांचे प्रसारण होते. त्यावर सर्व पत्रकारांनी मिळून अंकुश लावावा.

सभागृह नेता ऍड. महेश कनकदंडे यांनी सांगितले की, पत्रकार हा ज्ञानाचा धडा आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी आपला धर्म जागृत ठेवून शिक्षण क्षेत्रात धर्मनिरपेक्षता बाळगली होती. त्याप्रमाणे आजही पत्रकारांनी त्या घटनेतील मुळ भाव जागृत व्हावा अशा पध्दतीने आणि बातमीमुळे भेदभाव दिसेल अशा बातम्या प्रकाशीत करू नये.
या कार्यक्रमात पत्रकार मुन्तजिबोद्दीन, प्रल्हाद उमाटे,संतोष पांडागळे यांनी आपल्यावतीने पत्रकारीतेविषयी आपली भुमिका मांडली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍड. महेश कनकदंडे यांनी केले. या कार्यक्रमात महानगरपालिकेचे अधिकारी अजितपालसिंघ संधू, नगरसेवक फहीम यांच्यासह पत्रकार अनिकेत कुलकर्णी, हैदर अली, सुरेश काशिदे, अनुराग पवळे, बजरंग शुक्ला, कंथक सुर्यतळ, भुषण सोनसळे, मोहम्मद सादीक, शेख मुजिब, सतिश मोहिते, नासेर सानी, सिद्दी रेहान, फेरोज खान, मोहम्मद तारीख यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
भिती न बाळगता पत्रकारीता करा-रामप्रसाद खंडेलवाल

या प्रसंगी पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी पत्रकाराची लेखणी असते दुधारी लागू नये कोणाच्या जिव्हारी या कवीवर्य जगदीश खेबुडकरांच्या शब्दांचा उल्लेख करून सांगितले की, पत्रकारांनी कोणाच्या जिव्हारी लागेल असे शब्द न वापरता बातमी प्रसारीत केली पाहिजे. ज्यांना जिव्हारी लागू नये असे वाटते त्यांनी सुध्दा आपल्याकडून चुक होणार नाही. याची दक्षता घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या भितीला मनात न बाळगता पत्रकारीता करतांना आपली मान खाली घालावी लागणार नाही यासाठी सर्व पत्रकारांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *