इतवारा गुन्हे शोध पथकाने चार चोरी प्रकरणातील 1 लाख 32 हजारांचा ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-दि.1 जानेवारी रोजी पकडलेल्या एका चोरट्याकडून इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने विविध चार चोऱ्यांमधील 1 लाख 32 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. हा चोरटा उद्या रविवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
इतवारा पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात मोहम्मद एजाज उर्फ बॅनेट मोहम्मद अकबर रा.इस्लामपूरा यास 1 जानेवारी 2022 रोजी अर्धापूर येथून ताब्यात घेतले. त्याने विविध तिन गुन्हे केल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याीच पोलीस कोठडी घेण्यात आली. तेंव्हा गुन्हा क्रमांक 81 आणि 318/2021 आणि तसेच गुन्हा क्रमांक 2/2022 आणि 4/2022 मध्ये चोरीला गेलेली रोख रक्कम, दोन मोटारसायकली आणि एक टेम्पोचे खुले भाग करून त्याची विक्री केलेली इंजिन व इतर साहित्य असा 1 लाख 32 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. सध्या हा मोहम्मद एजाज उर्फ बॅनेट उद्यापर्यंतच्या पोलीस कोठडीत आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभाग इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी या चोरट्याला पकडून चांगली कामगिरी केल्याप्रकरणी इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, पोलीस अंमदार भिसाडे, मानेकर, समिर, दासरवाड, आणि जावीद यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *